Ticker

6/recent/ticker-posts

वनविभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहेत ?


रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:  मौजा गिरोला ( जपानी  ) येथील वन  समितीचे अध्यक्ष युवराज पर्वते यांच्या शेत सर्वे नंबर १६० मधील सागवान व आडजात वृक्ष तोडल्याची तक्रार वनविभाग ऑफिस साकोली. लाखनी. भंडारा येथे दिनांक १५ मे २०२६ रोजी दाखल करण्यात आली. त्यावर वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही. डी एफ ओ यांचे आदेशाने आर. एफ. ओ. व आर. ओ. यांनी कास्तकार यादव पर्वते यांचेवर दबाव टाकून सदर झाडे मी स्वतः कापली आहेत असे लिहून मागितले. २१ मे २०२६ रोजी आर.एफ.ओ धनविजय  यांचे स्वाक्षरीने सदर वृक्षतोडीची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे वॉटसअप वरून पत्र दिले. वृक्ष तोडल्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे आर. एफ. ओ. सांगत आहेत. तर झाडे तोडण्यासाठी ग्रामपंचायत गिरोला जपानी येथे जाहीरनामा प्रसिद्ध कसा व कशाचे आधारे केला. त्यांचेकडे वृक्ष तोडीचा परवाना करिता प्रकरण त्यांचे म्हणण्यानुसार आलेच नाही. तर वृक्ष तोडीचा परवाना नाकारत असल्याचे पत्र कसे दिले. झाडे ठेकेदारा मार्फत तोडून दुसरीकडे नेले. त्याठिकाणाहून संजय बडवाईक या ठेकेदाराने ट्रॅक्टरने एकूण ५  ट्रॅक्टर झाडे दुसरीकडे अंदाजे १० की.मी. दूरवर नेली आहेत. या विषयी कोणतीही माहिती तक्रारदार युवराज पर्वते यांना आजतागत पर्यंत दिली नाही. कास्तकाराने स्वतः झाडे कापले म्हणतात तर त्यांनी कास्तकार , ठेकेदार, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेवर डी. एफ. ओ. यांनी कार्यवाही का केली नाही असा सवाल गावकरी व तक्रारदार यांनी केला आहे. डी. एफ.ओ. सदर प्रकरणावर पांघरूण घालण्याचे काम करत आहेत काय ? तक्रारदार स्वतः डी. एफ. ओ. यांचेकडे गेले असता आम्ही काय कार्यवाही करावी तुम्ही सांगा असे बोलतात. एकीकडे दोषींवर कारवाई करण्याचे सोडून दोषींची पाठराखण करत आहेत हा कुठला न्याय आहे. २२ मे २०२६ पासून डी. एफ. ओ. यांनी कोणतीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतली आहे. डी. एफ. ओ शिंग यांनी आर. एफ ओ. धनविजय व आर. ओ. राज मेश्राम यांना सूचित करून काहीही करा, कसेही करा. तक्रारदार यांचे प्रकरण थांबवा असा आदेश दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आर. एफ. ओ. धनविजय व आर. ओ. मेश्राम तक्रारदार यांना ऑफिस मध्ये बोलावून आपण बसून काहीतरी करू, आम्हाला वाचवा. तुमच्याच हातात आहे. असे कशाला म्हणत आहेत. त्यांनी वृक्ष तोडीच्या प्रकरणात त्यांचा काही संबंध नाही असे दर्शवितात तर सेटिंग ची भाषा का करत आहेत. एकीकडे आर. एफ. ओ. धनविजय झाडे तोडण्याची अनुमती मी दिली आहे असे सांगतात. दुसरीकडे झाडे तोडण्याचा परवाना नाकारत असल्याचे सांगतात. ही दुटप्पी भूमिका आर. एफ. ओ. धनविजय का बजावत आहेत. डी. एफ. ओ.  यांनी २२ में २०२६ पासून कोणती कागदोपत्री कारवाई केली आहे त्याची लेखी माहिती तक्रारदार यांना देतो म्हणून सांगितले परंतु त्यांनी आजपर्यंत कोणतीही माहिती लेखी स्वरूपात दिलेली नाही. त्यामुळे डी. एफ. ओ. यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या