चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार निवासी शिबिराचा समारोप नुकतेच जेसीस स्कूल हॉलमध्ये सामुदायिक प्रार्थनेनंतर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेसीस कॉन्वेंट स्कूल च्या मुख्याध्यापिका कविता भोंगाडे मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार श्री चरणभाऊ वाघमारे,प्रमुख शिक्षक हभप श्री विनायकराव कावळे गुरुजी, गुरुदेव सेवा मंडळचे अध्यक्ष श्री मोहनदादा निर्वाण, जि.प. सदस्य श्री यशवंत सोनकुसरे इत्यादी मान्यवर सह गुरुदेव सेवा मंडळचे सर्व पदाधिकारी,सेवक कार्यकर्ते इत्यादि उपस्थित होते.
प्रथम मान्यवर पाहुणे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शॉल ने स्वागत करण्यात आले.
पाहुण्यांनी शिबिरार्थी मुलांना योग्य ते मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक गुरुदेव सेवामंडळचे सचिव श्री नामदेव आवारकर यांनी केले. सूत्र संचालन अर्चना भोयर यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका प्राची उखरे यांनी मानले.


0 टिप्पण्या