चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शहरातील युवा नेतृत्व गोलू आनंदराव गेडाम यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाच्या विचारसरणीवर आपला विश्वास व्यक्त केला. हा पक्षप्रवेश जिल्हा प्रमुख भास्कर भाऊ ताजने यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी तालुकाप्रमुख नरेश काळे, भद्रावती शहरप्रमुख बंटी हेमके, माजरी शहरप्रमुख राहुल तलावार, माजरी युवासेना शहरप्रमुख साईकिरण संध्यावाणी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक विजय मत्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोलू आनंदराव गेडाम यांचा पक्षाचा दुपट्टा परिधान करून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात जाहीर स्वागत करण्यात आले.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून युवक मोठ्या संख्येने पक्षाशी जोडले जात आहेत. गोलू आनंदराव गेडाम यांच्या पक्षप्रवेशामुळे भद्रावती शहरातील पक्ष संघटनेला नवे बळ मिळणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अधिक जोमाने जनते समोर उभा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.युवा शक्तीचा वाढता सहभाग आणि शिवसेनेच्या विचारांवरील दृढ विश्वास हेच पक्षाच्या वाढत्या जनाधाराचे प्रतीक असून, भद्रावती शहरात भगवा अधिक जोमाने फडकत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


0 टिप्पण्या