Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीत शेतशिवारात अनोळखी पुरुषाचा मृतदेह! ओळख पटवण्याचे आवाहन

शेतकरी हॉटेलमागे सापडला 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; भिकारी/मानसिक रुग्ण असल्याचा अंदाज

राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती: भद्रावती शहराजवळील चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतकरी हॉटेलच्या मागील शेतशिवारात रविवारी 28 जून सायंकाळी सुमारे 4.25 वाजता एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती डायल 112 वर प्राप्त होताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मृत व्यक्तीचे अंदाजे वय 52 वर्षे, उंची सुमारे 165 सें.मी. आहे. त्याचा रंग काळा-सावळा असून शरीरयष्टी अत्यंत हडकुळी व खंगलेली आहे. पांढरे-काळे केस व दाढी आहे.  

 गडद निळ्या रंगाचा लाल-पांढऱ्या चौकोनी डिझाइनचा शर्ट, ग्रे रंगाची मळकट पँट, कंबरेला वॉटर फायटर कंपनीचा रेनकोट तसेच पायात RICKY कंपनीच्या स्लिपर आढळून आल्या आहेत.

प्राथमिक पाहणीत संबंधित व्यक्ती भिकारी अथवा मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेतील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

भद्रावती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 54/2026, कलम 194 अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथील शवगृहात ओळख पटेपर्यंत सुरक्षित ठेवण्यात आला आहे.  
या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा आपल्या परिसरातील बेपत्ता व्यक्तीशी वर्णन जुळत असल्यास नागरिकांनी तातडीने भद्रावती पोलीस स्टेशन अथवा सपोनि विरेंद्र केदारे मो. 8381050975 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

____________________________________

ओळख पटवा: भद्रावतीत अनोळखी मृतदेह

भद्रावती NH-44 लगत शेतकरी हॉटेलमागील शेतात 28 जून सायं. 4.25 वा. 52 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह. उंची 5.5 फूट, काळा-सावळा, हडकुळा, पांढरी दाढी. निळा चौकडी शर्ट, ग्रे पँट, रेनकोट, RICKY स्लिपर. ओळख पटत नाही. माहिती असल्यास त्वरित भद्रावती पोलीस स्टेशन किंवा सपोनि विरेंद्र केदारे 8381050975 यांना कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या