Ticker

6/recent/ticker-posts

‘रन फॉर बाळूभाऊ’ हाफ मॅरेथॉनला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद


मुंबईच्या सचिन यादवचे अव्वल स्थान; चंद्रपूरच्या साक्षी पोलीजवार महिला गटात प्रथम*श

मराठा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर स्मृतिप्रीत्यर्थ भव्य क्रीडा सोहळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चंद्रपूरच्या भूमीत ऐतिहासिक ‘रन फॉर इन्स्पिरेशन, रन फॉर बाळूभाऊ’ राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन संपन्न झाली. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रीडा सोहळा पार पडला.

स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार भद्रावती ते पडोली चौक, चंद्रपूर या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू व क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व गर्दी केली. विशेष आकर्षण म्हणून छोटूलाल सोमलकर यांनी वाहनावर तिरंगा लावून मॅरेथॉन रॅलीचे नेतृत्व केले.

*विजेत्यांची यादी:*  
*खुला गट:*  
1. सचिन यादव, मुंबई - प्रथम 1,00,000 रुपये  
2. राजन यादव, नागपूर - द्वितीय 51,000 रुपये  
3. नागराज खुडसंगे - तृतीय 31,000 रुपये

*महिला गट:*  
1. साक्षी पोलीजवार, चंद्रपूर - प्रथम 15,000 रुपये  
2. अभिलाषा भगत - द्वितीय 10,000 रुपये  
3. श्रद्धा थोरात - तृतीय 5,000 रुपये  
प्रोत्साहन: अचल रमेश कंदुकर

*स्थानिक गट - चंद्रपूर लोकसभा:*  
1. विवेक भगत - प्रथम 21,000 रुपये  
2. रितिक ढोडरे - द्वितीय 11,000 रुपये  
3. यश सातपुते - तृतीय 7,000 रुपये

कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर, सुरज गावंडे, प्रशांत काळे, नगरसेवक राहुल चौधरी, सरिता सूर, सुनील नामोजवार यांसह राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

_____________________________________
🏃‍♂️ रन फॉर बाळूभाऊ’ला राज्यभरातून प्रतिसाद!

चंद्रपूरात दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर स्मृतिप्रीत्यर्थ हाफ मॅरेथॉन संपन्न. भद्रावती ते पडोली चौक धावपटूंची गर्दी. मुंबईच्या सचिन यादवला 1 लाखाचे बक्षीस. चंद्रपूरची साक्षी पोलीजवार महिला गटात विजेती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या