चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : सुप्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांचे इतिहास संशोधनावर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची वस्तुस्थिती मांडणारा द किरण माने शो ' स्टोरी शिवराज्याभिषेकाची ' हा नाट्य प्रयोग रविवार, दिनांक 12 जुलै ला सायं. 6 - 00 वा. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह , चंद्रपूर येथे आयोजित केला आहे . या संबंधाने अलीकडेच स्थानिक शासकीय विश्रामगृहात संयोजन समितीची बैठक बोलाविण्यात आली होती . साताऱ्याहून हा प्रयोग घेऊन येणारे सिने कलाकार किरण माने आणि 35 - 40 सहकलाकारांच्या टीमचा एकूण खर्च लक्षात घेता सदर प्रयोगाचे एक हजार, सातशे, पाचशे असे तिकीट दर ठरविण्यात आले असून त्यानुसार बुकिंग सुरु आहे .
प्रसिद्ध उद्योजक कुंदन ढोरे यांचे हस्ते या नाट्य प्रयोगाचे उदघाटन होणार असून जिल्हा सी.डी. सी.सी. बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, प्रसिद्ध रंगकर्मी डॉ. जयश्री कापसे, संवाद प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंद्रकांतजी वासाडे, आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रा.डॉ.इसादास भडके, डॉ.विनोद नगराळे, डॉ.विजय उराडे, इंजि. गौतम नागदेवते, शिलवान ढोके, एड. राजेश वनकर हे अतिथी असून होणाऱ्या औपचारिक उदघाट्न सोहळ्याचे अध्यक्ष दिलीप वावरे प्रसिद्ध उद्योजक , चंद्रपूर हे राहणार आहेत .
मुख्य संयोजक, युवा नेते संतोष कुचणकर यांचे मार्गदर्शनात वरील आयोजनाची जय्यत तयारी सुरु असून शहरात ठिकठिकाणी आकर्षक होर्डिंग्स लावण्यात आले आहेत.
प्रा.डॉ.दिलीप चौधरी, इंजि. नागवंश नगराळे, डॉ. अभिलाषा गावतूरे , प्रा. माधव गुरुनुले, दिपक जेऊरकर, प्रा. मिलिंद भगत, प्रदीप देशमुख, एड. रवींद्र मोटघरे, बुद्धप्रकाश ठमके, वैशाली रामटेके, विद्याधर लाडे, संगीता धोटे, नयन देशकर, सिद्धांत पुणेकर इ. संयोजक यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत . तिकिटसाठी 9850351524 , 9822468265, 8788204052, 8855956464, 9423419100, 8624046403, 9158987292, 9422907663 या क्रमांकावर संपर्क करावा असे संयोजन समितीतर्फे आवाहन करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या