Ticker

6/recent/ticker-posts

चार वर्षीय चिमुरडीशी अश्लील चाळे; ७५ वर्षीय वृद्धाला बेड्या


प्रतिनिधी : राजेश येसेकर

 चंद्रपूर : भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षीय चिमुरडीसोबत ७५ वर्षीय वृद्धाने घाणेरडे अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आई-वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहते. शुक्रवार दि. १७ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असताना, आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. 

घरी परतल्यानंतर चिमुरडीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर तक्रार दाखल होताच भद्रावती पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आणि त्याला बेड्या ठोकल्या.

आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहिता कलम ६४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या