Ticker

6/recent/ticker-posts

शासनाचे आदेश पायदळी तुडवित ड्राय डे रोजी उघडले हाळी येथील देशी दारु दुकाण.जिल्हा दारुबंदी पथकाने केली कारवाई..बातमी घेणा-या पञकाराशी वेटरची अरेरावी..दुकाण कायमचे बंद करा,त्या वेटरवर कारवाई करा,जनतेची मागणी....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर:-दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्ताने दि.२५ रोजी शासनाच्या आदेशान्वये ड्राय डे घोषित करण्यात आला.म्हणजे आषाढी एकादशी रोजी देशी,विदेशी दारु विक्रीची दुकाणे बंदचे आदेश असतानाही उदगीर तालुक्यातील हाळी येथील शासनमान्य किरकोळ विक्री देशी दारुचे दुकाण नेहमीप्रमाणे आषाढी एकादशी दि.२८ रोजी सकाळी ६ वा.दरम्यान उघडून धंदा करत असताना जिल्हा दारुबंदी खात्याचे वरिष्ठ प्रकाश दाते व त्यांच्या भरारी पथकाने धाड टाकली असता हाळी येथील शासनमान्य देशी दारुचे दुकाण शासनाचे परवाना आदेश पायदळी तुडवून उघडे असल्याचे पथकांच्या निदर्शनास येताच पथकाने स.७ ते १० वा.पर्यंत मेन गेट बंद करुन कारवाई संदर्भातली प्रोसेर पुर्ण केली.मग पथक बाहेर येताच पथक प्रमुख प्रकाश दाते यांच्याकडे सदर कारवाई बद्दल हाळी-हंडरगुळीतील कांही पञकारबांधव माहिती विचारत असताना या दुकाणातील एक स्थानिक मॅनेजर कम वेटर या दुकाणाबद्दल काय छापायचे ते छाप,आमचे कुणीच वाकडे करु शकत नाही!किरकोळचा परवाना असून ही आम्ही रोज १५,२० पेट्या ठोक मध्ये विकतोत. असे संबंधित पथकाकडे माहिती मागणा-या पञकाराशी हुज्जत घालताना दुकाणातील एक मुजोर वेटर कम मॅनेजर म्हणाला.एकीकडे शासनाचे ड्राय डे चे आदेश आसतानाही हा दुकाणदार दुकाण उघडतोच कसा?कुणाच्या आर्शिवादाने?असे सवाल उपस्थित होत असून शासनाचे आदेश पायदळी तुडवून धंदा करणारे हाळीचे देशी दारु दुकाण सील करावे,त्या मुजोर हरामखोर वेटर कम मॅनेजरवरही कारवाई करावी, अशी मागणी गरिब व मजुर महिलाभगीणींसह जाणकारांमधून होत आहे.
तेंव्हा मा.जिल्हाधिकारी साहेब कोणती कारवाई करणार,याकडे हाळीहंडरगुळीकरांचे लक्ष लागले आहे.

*हाळीच्या दुकाणाबद्दल शंका,कुशंका.....!*
नामफलकावर प्रोपरायटरचे नाव नाही.म्हणुन या दुकाणाचा परवाना हाळीचाच आहे का इतर ठिकाणचा?जि.प.च्या २ शाळा,१ मस्जिद आणि शिवरायांचा पुतळा अगदी कांही पावलांवरच असूनही इतके दिवस हे दुकाण चालू होते कसे? का या दुकाणासाठीच शाळा,पुतळा,मस्जिद वगैरे नियम अस्तित्वात नाहीत का?
किरकोळ विक्री असा उल्लेख बोर्डावर आहे.
तरीही चोरटी दारु विकणा-यांना रोज १५,२० पेट्या दारु विकतो कसा?व कुणाच्या मदतीने?
पहाटे ५.३० वा.उघडायची आणि राञी ११ ते ११.३० पर्यंत दुकाण चालवायची परवानगी दिली कुणी? 
दुकाण चालू/बंदचा उल्लेख नाही..
२१ वर्षाखालील व्यक्तीस प्रवेश नाही.
हा उल्लेख दर्शनी भागात कुठेच लिहीला नाही...

आॅनलाईन तक्रार आल्यावरुन आम्ही त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आलो असता तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे हाळीचे देशी दारु दुकाण हाळी येथील छञपती शिवाजी महाराज पुतळा व जि.प.शाळा तसेच हंडरगुळी येथील मदीना मस्जिद व जि.प.केंद्रीय प्रा.शाळा यांच्या पासुन अवघ्या कांही पावले जवळच असल्याचे दिसले.तसेच शासनाचे म्हणजे लायसन्स परवान्यानुसार ड्राय डे चे आदेश पायदळी तुडवून दि.२५ जुलै रोजी उघडल्याचेही आढळून आल्याने आम्ही रितसर पंचनामा केला असून त्याचा अहवाल मा.जिल्हाधिकारी लातुर व मा.जिल्हा अधिक्षक दारुबंदी विभाग लातुर यांना सादर करणार असून याची पुढील कारवाई वरिष्ठच करतील.अशी माहिती प्रकाश दाते यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या