चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : लायन्स क्लब भंडारा सेंट्रल, संपत्ती देवी सारडा आरोग्य धाम केंद्र व समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन रोड, भंडारा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षांवरील) भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखर (Blood Sugar), नेत्र तपासणी, दंत (Teeth ) तपासणी, ईसीजी (ECG), CBC रक्त तपासणी तसेच डॉ. रमेश खोब्रागडे,डॉ रेणुका तिवारी व इतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य व आहार सल्ला देण्यात आला. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 117 मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
लायन्स क्लब भंडारा सेंट्रलचे अध्यक्ष लायन लोकेश एम. मोहबंसी यांनी उपस्थित नागरिकांचे स्वागत करून नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर,ला.रामविलास सारडा,ला शीतल नशीने,ला. कुमार नशीने, ला.पंकज राजाभोज, ला.सुभाष थानथराटे, ला. डॉ.मनीष बत्रा,ला.डॉ. मोनिका बत्रा,ला.विनोद भोंगाडे,ला.सचिन लेदे ,ला. स्नेहल लेदे, ला अरुण भेदे,ला. डॉ. योगेश जीभकाटे,ला.डॉ विशाखा जीभकाटे,पर्यावरण योद्धा सईद शेख,डॉ संजय मानकर व त्यांचे सहकारी, शासकीय जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक निर्वाण भीषक,डॉ.रत्नाकर बांडेबुचे मानसिक रोग तज्ञ, डॉ. शैलेश कुकडे NCD समन्वयक , श्रीमती चकोले आहार तज्ञ , शुभम गजभिये ECG तंत्रज्ञ, नितीन तितरमारे LLL समन्वयक व कर्मचारी , स्वयंसेवक, समाजकल्याण विभाग तसेच संपत्ती देवी सारडा आरोग्य धाम केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रमेश खोब्रागडे, व्यवस्थापन प्रमुख अल्का मंत्री, डॉ.रेणुका तिवारी मॅडम व त्यांचे सर्व सहकर्मी,मंजू कारेंमोरे (राष्ट्रीय कवयित्री),व त्यांचे सहकारी ,फेसकाॅम या सेवाजेष्ठ गटाचे अध्यक्ष जाधवराव साठवणे,प्रेमलाल लांजेवार व सहकारी तसेच इंद्राक्षी आय केअर ची चमू, यां सर्वांचे त्यांची उपस्थिति व सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानण्यात आले.
समाजोपयोगी व सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी लायन्स क्लब भंडारा सेंट्रल भविष्यातही अशा विविध सेवा सातत्याने राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


0 टिप्पण्या