Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात डायलिसिस रुग्णांसाठी मदतीचा उपक्रम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात डायलिसिस रुग्णांसाठी सामाजिक बांधिलकी जपत विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एका डायलिसिस रुग्णाला आवश्यक औषधे (मेडिसिन) उपलब्ध करून देण्यात आली. तसेच इतर डायलिसिस रुग्णांना पोषणमूल्ययुक्त न्यूट्रिशन फूडचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश डायलिसिस रुग्णांना उपचारांसोबतच आवश्यक पोषण व मानसिक आधार देण्याचा होता. उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक उपक्रमांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला डॉ. अभिषेक दीक्षित, डॉ. अमित प्रेमचंद, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमित प्रेमचंद, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मनीषा ढोमणे, कोषाध्यक्ष पूजा महाजन, रुकसाना शेख तसेच सीमा पवार उपस्थित होत्या.
उपस्थित मान्यवरांनी भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा संकल्प व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या