Ticker

6/recent/ticker-posts

" विद्यार्थ्यांनी मनकेंद्रित अभ्यास करणे आवश्यक " -प्रा.अरुण बुंदेले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे प्रा.बुंदेले यांची अभ्यासविषयक कार्यशाळा संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकोला :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन,खडकी,अकोला येथे दि. ७ जुलै २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान तर्फे आयोजित विद्यार्थ्यांच्या धम्मशिबिरामध्ये कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,अमरावती अंतर्गत
'आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला' फेम आणि 'आदर्श अभ्यासाचे तंत्र' या पुस्तकाचे लेखक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांची
 "अभ्यास विषयक कार्यशाळा" संपन्न झाली.
      अभ्यास विषयक कार्यशाळेचे अध्यक्ष समाज प्रबोधनकर्ते प्रा.मुकुंद भारसाकळे (अध्यक्ष,डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला)होते तर प्रमुख अतिथी अशोक इंगळे,कोषाध्यक्ष रमेश तायडे, संतोष सोनोने (पुणे) होते .
     तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
    प्रमुख अतिथी व कार्य शाळेचे प्रमुख प्रा.अरुण बुंदेले यांचा सविस्तर परिचय मा. तुषार खंडेराव यांनी करून दिला.
   प्रा.अरुण बुंदेले यांनी 'अभंग तरंग' या स्वतःच्या काव्यसंग्रहातील 'भीमराव' या अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
       अभ्यासविषयक कार्यशाळेचे सादरीकरण करताना प्रा.अरुण बुंदेले म्हणाले की,"विद्यार्थ्यांनी कोणत्याही वर्गातील कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना मनकेंद्रित केला पाहिजे.प्रत्येक विषयाचा अभ्यास समान केला पाहिजे. नियमित अभ्यासाचे आदर्श वेळापत्रक तयार करून
अभ्यास केल्यास कोणताही विद्यार्थी गुणवंत होऊ शकतो." असे विचार व्यक्त केले.
       या अभ्यासविषयक कार्यशाळेत विद्यार्थीप्रबोधन कर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी मराठी वर्णमाला, वळणदार हस्ताक्षरांचे महत्त्व व नियम,शुद्धलेखनाचे महत्त्व व नियम,मराठी व्याकरण,आदर्श उत्तरपत्रिका सोडवण्याची कला,मनकेंद्रित वाचन व अभ्यासाचे महत्त्व इत्यादी अभ्यासविषयक कार्यशाळे तील ३० मुद्द्यांचे सादरीकरण प्रासादिक शैलीत करून विद्यार्थ्यांची मनं जिंकली. 
      याप्रसंगी प्रा.बुंदेले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्दशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या 
राष्ट्रभूषण ग्रंथालयासाठी ५० मासिक शिक्षण संक्रमण व ग्रंथ तसेच शिबिरातील विद्यार्थ्यांना नोटबुक मान्यवरांच्या हस्ते सस्नेह भेट दिले.

" प्रा.बुंदेले यांची अभ्यास विषयक कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनमोल "
                   - प्रा.मुकुंद भारसाकळे

          याप्रसंगी कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा.मुकुंद भारसाकळे यांनी, "प्रा.बुंदेले यांची अभ्यास विषयक कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय अनमोल असून ती प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये झाली पाहिजे.आमच्या शिबीरातील विद्यार्थ्यांच्या मनात या कार्यशाळेमुळे निश्चितच अभ्यासाची प्रेरणा निर्माण होईल यात शंका नाही" असे विचार व्यक्त केले.
     कार्यशाळेचे संचालन रमेश तायडे यांनी तर आभार तुषार खंडेराव यांनी मानले.
       याप्रसंगी धम्मसंस्कार वर्गाच्या शिक्षिका कु. निकिता गवई, सौ.शीतल चिकाटे,धम्म संस्कार वर्गाचे विद्यार्थी, जंजाळ साहेब (मुंबई),सिद्धार्थ चक्रनारायण,गौतम गवई,ईश्वर चिकटे,अविनाश क्षिरसागर, डॉ.जया वजिरे,सत्यशील घ्यारे, प्रसनजीत तेलगोटे,सौ.सुषमा शिरसाट,रवींद्र सरदार,शुभम तेलगोटे,आकाश लहाळे, मिलन इंगळे,रवि इंगळे, सौ.पंचफुला वाघ,सौ.संगीता इंगोले,सौ.पद्मा भगत,कुणाल जामनिक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या