चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर :-उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाढवणा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून स्वप्नील अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य स्वरूपामध्ये सार्वजनिक जयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली आहे.
संयोजन समितीच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच वाढवणा फेस्टिवलच्या निमित्ताने नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम येणाऱ्या 11 ते 18 वर्ष वयोगटातील स्पर्धकांना प्रथम पारितोषक वाढवणा येथील माजी सरपंच नागेश थोंटे यांच्यावतीने अकरा हजार रुपये तर द्वितीय परितोषक सलीम भाऊ तोंडारे आणि रहीम मनियार यांच्या वतीने सात हजार रुपये तर तृतीय पारितोषक वाढवण्याचे चेअरमन संतोष सोमासे आणि शिवा मिरजगावे यांच्या वतीने पाच हजार रुपये, तसेच उत्तेजनार्थ पारितोषक बुद्धवासी राम जळबा गायकवाड यांच्या स्मरणार्थ 2100 रुपये तसेच वैयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये देखील पारितोषके ठेवली असून प्रथम पारितोषक अन्वर हवालदार यांच्यावतीने पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषक अमोल भैया पुंड यांच्यावतीने तीन हजार रुपये, तृतीय पारितोषक अमजद (लड्डू) पठाण ग्रामपंचायत सदस्य वाढवणा यांच्या वतीने दोन हजार रुपये, तसेच उत्तेजनार्थ दादा मिया कुरेशी यांच्या वतीने अकराशे रुपये बक्षीस दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्निल अण्णा जाधव, उपाध्यक्ष महावीर भांगे, सचिव बाळाभाऊ जाधव, कार्याध्यक्ष शैलेश जाधव, अंगद जाधव, किरण जाधव, नागेश जाधव, सुरज जाधव, हनुमंत जाधव, बाबासाहेब जाधव, आनंद भांगे, अमोल जोंधळे, माधव अंधारे, मोहन जाधव, दिनकर जाधव, श्याम जाधव, बाळू जाधव, प्रीतम जाधव, नवनाथ जाधव, झोटिंग जाधव, कृष्णा भांगे, सुदर्शन देशमुख, अजय अंधारे, अहमद कुरेशी, संदीप जाधव, मनोज जाधव, संभाजी जोंधळे, विशाल जाधव, किशोर भांगे, किशोर जाधव, परमेश्वर जाधव, कृष्णा जाधव, अमोल जाधव, अजय जाधव, आकाश जाधव, अक्षय भांगे, सुनील जाधव, अनिल जाधव, विकी जाधव, कपिल वाघमारे, आदित्य भांगे, आनंद गायकवाड, संतोष केदासे, विश्वजीत गायकवाड, सचिन भांगे, मारुती गायकवाड, मुकेश गायकवाड, शुभम गायकवाड, शुभम जोंधळे, व्यंकट जाधव, विनोद जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, ओमकार कारभारी, अक्षय अंधारे, चंदू जाधव, ओमकार जाधव, आकाश जाधव, अतुल जाधव, ऋतिक जाधव, सचिन जाधव, भुजंग भांगे, अजित कारभारी, सुनील गायकवाड, नागेश जाधव, आनंद जाधव, भैय्यासाहेब भालेराव, सुनील कांबळे, जयेश कांबळे, रतन जाधव, विजय जाधव, नितीन सूर्यवंशी, माधव जाधव, शेषराव गायकवाड, दीपक भांगे, क्रांती जोंधळे, बालाजी जाधव इत्यादींनी संयोजन केले आहे.
या जयंती महोत्सव समितीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांना एकत्रित आणून उपवर्गीकरणाच्या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही स्वप्निल अण्णा जाधव यांनी सांगितले.


0 टिप्पण्या