कर्तव्य बजावत असताना निधन, बोर्डा येथे अंत्यसंस्कार
प्रतिनिधी : होमराज घुमे.
वरोरा : शहरालगतच्या बोर्डा येथील रहिवासी आणि जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्समध्ये कार्यरत जे.ई. (सिव्हिल) सुबेदार खुशाल देवराव मांडवकर यांचे मंगळवारी 28 जुलैला सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना उपचारादरम्यान निधन झाले.
खुशाल मांडवकर हे सिक्कीममध्ये बॉर्डर रोड आर्मी दलात कार्यरत होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना सिक्कीममधील सैन्याच्या 327 फील्ड हॉस्पिटल (आर्मी), चुंगथांग, जिल्हा मंगन येथे दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाच 28 जुलैला सकाळी 8.50 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
बीआरओच्या 86 आरसीसी (जीआरईएफ) चे कमांडिंग ऑफिसर मेजर डी. विवेक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात मांडवकर यांनी 16 वर्षे शिस्त, निष्ठा आणि धैर्याने देशसेवा बजावल्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारापूर्वी गार्ड ऑफ ऑनर देण्याची विनंतीही केली आहे.
मांडवकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव बोर्ड येथे 29 जुलैला रात्री शासकीय इतमामात बोर्ड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले आहे.
_________________________________
वरोरा तालुक्यातील जवान शहीद
बोर्डा येथील जीआरईएफ मधील जे.ई. सुबेदार खुशाल मांडवकर यांचे 28 जुलैला सिक्कीममध्ये कर्तव्यावर असताना निधन झाले. 16 वर्षे देशसेवा करणाऱ्या मांडवकर यांचे पार्थिव 29 जुलैला रात्री बोर्ड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
💐_भावपूर्ण श्रद्धांजली_ 💐


0 टिप्पण्या