Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग (टेंपररी) मानधन चार महिन्यांपासून बंद आहे, त्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, तहसीलदार ला निवेदन प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी,,,

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड -पुर्णा येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे पुर्णा ता, अध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी स्वतः तहसील कार्यालयात जाऊन जाब विचारला त्यांची बोलती बंद झाली तहसीलदार कडे हि मागणी केली की दिव्यांग (टेंपररी) मानधन त्वरित चालू करावे आज चार महिन्यांपासून दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले तहशिल च्या चकरा मारत आहेत,हे अधिकारी त्यांना न जुमानता सर्रास हाकलून देत आहेत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने दिव्यांग आर्थिक संकटात सापडले आहेत त्यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे आणि हे मुजोर अधिकारी तीन ते पाच हजार रु घेऊन काम करुन देत आहेत आणि जो पैसा देऊ शकत नाही त्यांना अक्षरशः हाकलून देत आहेत त्यांनी कुठे दाद मागावी असा प्रश्न त्यांना पडला आहे,ही दिव्यांगाची व्यथा पाहुन पुर्णा ता, अध्यक्ष यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रहार दिव्यांग संघटने तर्फे आमरण उपोषणाचा इशारा दिला  दिव्यांग (टेंपररी)मानधन चार महिन्यांपासून मिळाले नाही ते मिळाले पाहिजे आणि ते शासन निर्णयानुसार चालू राहिले पाहिजे,आठ दिवसांत याच्या वर निर्णय झाला पाहिजे,,, पुर्णा ता, अध्यक्ष, शिवहार सोनटक्के,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या