Ticker

6/recent/ticker-posts

जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणात लाखनी पोलिसांची मकोका अन्वये कारवाई

बोलेरोसह 8.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत,14 गोवंशांपैकी 1 मृत

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी, श.प्र.: जनावरांच्या अवैध वाहतूकीच्या प्रकरणात लाखनी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 म्हणजेच "मकोका" अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दि. 21जुन रोजी सकाळी 06:30 वा. सुमारास पोलीस पथक पेट्रोलींग करीत असताना मौजा- मोरगाव/राजेगाव टोली येथे एक बोलेरो पिकअप क्र.एमएच 40 डीसी. 1395 संशयास्पदरित्या उभी दिसून आली. तपासणी दरम्यान पिकअपच्या डाल्यामध्ये एकूण 14 गोवंश जनावरे आढळून आली. त्यापैकी 1 जनावर मृत अवस्थेत होते. सदर जनावरांची एकूण किंमत 1,40,000/- रु. आहे. या प्रकरणातील वाहनचालक सम्राट येवले, वय 30 वर्षे, रा. गोरेगाव हा घटनास्थळावरून पळून गेला.फिर्यादी पो.शि. सचिन गजानन बुधे यांच्या लेखी तक्रारीवरून पो.ठाणे लाखनी येथे पशु संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून बोलेरो पिकअप. 7 लाख रुपये व 14 गोवंश जनावरे किं. 1,40,000/- असा एकूण 8,40,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मकोका अन्वये कारवाई

सदर गुन्ह्यातील आरोपी सम्राट येवले हा संघटीतरित्या अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस स्टेशन लाखनी येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार श्री. आशिष गजभिये यांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीविरुद्ध मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अन्वये कलम वाढ करण्याची परवानगी दिली. त्यानुसार आता या गुन्ह्यात मकोका प्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.मा. श्री. नूरुल हसन, पोलीस अधीक्षक भंडारा, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली श्री. शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, पो.हवा. अमितेश वडेटवार, वच्छला चाचेरे, पो.शि. सचिन बुधे, ओमप्रकाश सार्वे, भुपेश हटवार, प्रशांत धकाते सहकार्य केले असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवम विसापुरे साकोली हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या