Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी पोलिसांची मोठी कारवाई : अट्टल मोटार सायकल चोरट्यास अटक, 10 मोटार सायकल हस्तगत


बनावट आरसी तयार करून गाड्या विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.): लाखनी पोलिसांनी अट्टल मोटार सायकल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या 10 मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 2,50,000/- रु. आहे. आरोपी बनावट आरसी तयार करून मोटार सायकल विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रकरण काय आहे? 

दिनांक 22/02/2026 रोजी दुपारी 02:00 वा. सुमारास तक्रारदार प्रकाश रुपचंद कांबळे, वय 25 वर्षे, रा. पोहरा हे त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र. एमएच 40 एएस 8285 ने पोहरा येथील शंकरपट पाहण्यासाठी गेले होते. सायं. 05:00 वा. सुमारास परत आल्यावर त्यांची मोटार सायकल मिळून आली नाही. आजूबाजूला शोध घेतल्यानंतरही मिळून न आल्याने दि. 24/02/2026 रोजी अज्ञात इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन लाखनी येथे तक्रार देण्यात आली. त्यावरून कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार सुरेश आत्राम हे करीत होते.


पोलिसांनी कसा लावला छडा?
 
पोलीस स्टेशन लाखनी येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार श्री. आशिष गजभिये यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे मार्गदर्शन केले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे विक्की वसंता रामटेके, वय 30 वर्षे, रा. मंगळवारी पेठ, उमरेड, जि. नागपूर याने मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.आरोपीला पकडण्यासाठी गेलेले पथक उमरेड येथे पोहोचण्यापूर्वीच त्याला पोलिसांचा संशय आल्याने त्याने दि. 01/07/2026 रोजी चोरी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र. एमएच 40 एएस 8285 लाखनी येथील मोसीन बिर्याणी जवळ आणून ठेवली. त्यानंतर दि. 02/07/2026 रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गाडी मोसीन बिर्याणी जवळ ठेवल्याचे सांगितले. त्याठिकाणी जाऊन मोटार सायकलसह बनावट आरसी स्मार्ट कार्डही जप्त करण्यात आली.

एकूण 10 गाड्या हस्तगत

आरोपीला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने लाखनी, पालांदूर, साकोली, मौदा, उमरेड, नागपूर व रामटेक परिसरातून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून खालील 10 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या त्यामध्ये मोटार सायकल क्रमांक असे आहेत एमएच 36 डब्लू 5825,एमएच 36 एस 2268, एमएच 40 टी 2245, एमएच 31 डीएम 0627,एमएच 40 एई 9064, एमएच 49 एयू 9305,एमएच 49 क्यू 8395,एमएच 49 एक्यू 1809,एमएच 36 बी 4635,
एमएच 40 एएस 8285 असे एकूण 10 मोटारसायकल हस्तगत करण्यात आले.तपासात आरोपी बनावट आरसी तयार करून मोटार सायकल विक्री करीत असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.


अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

सदरची कार्यवाही मा. श्री. नूरुल हसन, पोलीस अधीक्षक भंडारा, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली श्री. शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, सहाय्यक फौजदार सुरेश आत्राम, पो.हवा. वच्छला चाचेरे, अमितेश वडेटवार, निलेश रामटेके, पो.शि. ओमप्रकाश सार्वे, भुपेश हटवार, प्रशांत धकाते, लक्ष्मीकांत झलके यांनी केली. 
पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष गजभिये हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या