Ticker

6/recent/ticker-posts

◻️नागपूरात "पुस्तक हेच खरे मित्र" •

◻️विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप • वाचनालयाचे उद्घाटन • हॅपी ग्रुपचा संकल्प • 

चित्रा न्यूज / प्रतिनिधी 

नागपूर : सेवा संकल्प हॅपी ग्रुप, नागपूरच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन शनिवार ०४ जुलैला करण्यात आले. यावेळी "पुस्तक हेच खरे मित्र" या संकल्पनेतून वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या एकूण १४ दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक आहार साहित्याचेही वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि अभ्यास अधिक समृद्ध व्हावा या उद्देशाने वाचनालयात हिंदी, मराठी व इंग्रजी भाषांतील निबंध लेखन, पत्रलेखन, व्याकरण, ॲटलस, कथा-कादंबऱ्या, दिवाळी अंक, योगासने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके, बालकथा तसेच विविध विषयांवरील ज्ञानवर्धक पुस्तकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी वाचनालयाचा नियमित लाभ घेऊन वाचनाची सवय जोपासावी, ज्ञानसमृद्ध व्हावे आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्र गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेत आनंददायी वातावरणात झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या