Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबांना वस्त्रवाटप राजकुमार भगत यांचा समाजापुढे आदर्श;


चित्रा न्युज प्रतिनिधी 
यवतमाळ :-वाढदिवसाच्या औचित्याने सामाजिक बांधिलकी जपत राजकुमार भगत यांनी पालावर राहणाऱ्या गरजू कुटुंबांना कपड्यांचे वाटप केले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमामध्ये पुरुष, महिला व लहान मुलांसाठी उपयोगी कपड्यांचे वितरण करण्यात आले. वस्त्रवाटपामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. वाढदिवसाचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याच्या निर्णयाचे उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केले.

राजकुमार भगत हे स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था,बेलोरा तसेच आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष, यवतमाळ  म्हणून कार्यरत असून विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतात. त्यांच्या या उपक्रमातून समाजसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उपस्थित नागरिकांनी अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले. वाढदिवस साजरा करण्याची ही समाजाभिमुख पद्धत इतरांसाठीही अनुकरणीय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


राजकुमार भगत यांचे मत
“वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता आले, तर त्यापेक्षा मोठी भेट दुसरी कोणतीच नाही.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या