Ticker

6/recent/ticker-posts

न.प. संजाना उर्दू शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात व गरिमामय वातावरणात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-दि. ३० जून २०२६ रोजी नगर परिषद संजाना डिजिटल उर्दू उच्च प्राथमिक शाळा, पवनी येथे नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, आनंददायी आणि गरिमामय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी मा. श्री. अश्विन पर्धी सर, तर विशेष अतिथी म्हणून नगरसेवक जनाब शहजाद बेग साहेब तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पुष्प देऊन आत्मीय स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके, पेन-पेन्सिल, चॉकलेट तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना मध्याह्न भोजन (Mid-Day Meal) योजनेची माहिती देण्यात आली.
यावेळी मा. श्री. अश्विन पर्धी सर यांनी विद्यार्थी, पालक व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित उपस्थिती तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला. शाळेची विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सर्व नागरिक, पालक आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यालयाला उत्कृष्ट बनविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवित त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळा परिवारातर्फे सर्व अतिथी, पालक व उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
चला, आपण सर्वजण मिळून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश सुनिश्चित करूया. गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच सक्षम आणि सशक्त समाजाची खरी ओळख आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या