आमदार नाना पटोले यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधकाम
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी(श.प्र.) :तालुक्यातील निलागोंदी येथील जिल्हा परिषद शाळेला आमदार नाना पटोले यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या 12 लाख रुपये किमतीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उत्साहात संपन्न झाला.निलागोंदी जि.प. शाळेला अनेक वर्षांपासून इमारतीची गरज होती. इमारतीच्या अभावी विद्यार्थ्यांना बसण्याची अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन आमदार नाना पटोले यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून शाळेसाठी नवीन इमारत मंजूर केली होती.नवीन इमारतीचे लोकार्पण निलागोंदीच्या सरपंच सौ. वर्षा वंजारी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यामुळे आता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था झाली आहे.यावेळी उपसरपंच महेश हटवार, ग्रा.पं. सदस्य दिनेश वंजारी, सदस्या विद्या हटवार, प्रियती वरठे, सुषमा शेंडे, स्मिता बनसोड, मुख्याध्यापक डी.जी. वंजारी, शाळा समिती अध्यक्ष योगेश पडोळे, उपाध्यक्ष शैलेश वंजारी, सहा. शिक्षिका दीपाली ठाकरे, महेश हटवार - तुमसर नागरी पत संस्था व्यवस्थापक, शिशुपाल वरठे, महावीर वंजारी तसेच शाळा समिती सदस्या ऐश्वर्या हटवार, भारती हटवार, सुषमा भोयर, रुपाली वंजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन इमारत झाल्याने ग्रामस्थ आणि पालकांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


0 टिप्पण्या