कोहळी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-कोहळी समाज विकास मंडळ भंडारा यांच्या वतीने गत ३० वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही इयत्ता १० वी आणि १२वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ३० वा सत्कार सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा येथील इंद्रलोक सभागृह येथे पार पडला. या सोहळ्यात बक्षीस पुरस्कर्ते व दानदात्यांच्या सौजन्याने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम व बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील सेवानिवृत्त अभियंता व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वामनराव खुणे होते. प्रमुख पाहुणे अमरावती येथील रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी चे सहा. संचालक केशव कापगते, गडचिरोली येथील गोंडवाना सैनिक विद्यालयाचे प्राचार्य व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश संग्रामे तसेच माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते,नागपूर येथील कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांची विशेष उपस्थिती लाभली. मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश संग्रामे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे अभ्यास करणे होय, त्यामुळे परीक्षेचा किंवा अभ्यासाचा ताण न घेता स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा. क्रीडा क्षेत्र तसेच भारतीय डिफेन्स क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी आहेत. कोणत्याही परिस्थितीत कौटुंबिक किंवा आर्थिक परिस्थिती यशात आड येणार नाही याची खात्री बाळगा. डोक्याने योग्य नियोजन करून आपले ध्येय प्राप्त करा आणि आपल्या समाजाचा सांस्कृतिक वारसा, प्रथा व परंपरा जपा असे मार्गदर्शन केले. वामनराव खुणे यांनी सांगितले की, नोकरीव्यतिरिक्त व्यवसायामध्ये तरुणांसाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत; विद्यार्थ्यांनी या संधींचा शोध घेऊन पुढे जावे. केशव कापगते यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी मेहनती असावे आणि अभ्यासात सातत्य ठेवावे असा मोलाचा सल्ला दिला. इतरही अतिथीनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशवंत लंजे तर सूत्रसंचालन सहसचिव डॉ. खुशाल बोरकर, सहसराम बन्सोड व छाया कापगते यांनी पार पाडले. उपस्थितांचे आभार डॉ. दशरथ कापगते यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपाध्यक्ष डॉ. पतीराम डोंगरवार, सचिव डॉ. राजेश कापगते, कोषाध्यक्ष संजय खुणे, सदस्य वामनराव गायकवाड, धनराज काशीवार, मुरलीधर नाकाडे, शिवशंकर नाकाडे, निळकंठ कापगते, युवराज कापगते, मालती परशुरामकर, मंगला गौपाले मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच समस्त भंडारा कोहळी समाज बांधवांनी विशेष परिश्रम व सहकार्य केले.


0 टिप्पण्या