सुकणी सोसायटीचे नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी सुकणे व मुळे यांची निवड
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी-उदगीर तालुक्यातील सुकणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे नुतन चेअरमन म्हणुन विवेकजी सुकणे यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून उमाकांत मुळे यांची निवड झाली आहे.
या निवडीनंतर नुतन चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळांनी छञपती शिवाजी महाराज पुतळा व गावातील विविध मंदीरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी वाजत-गाजत व फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत सोसायटीच्या नुतन पदाधिका-यांची मिरवणुक काढून सुकणी येथील जनतेनी नुतन चेअरमन,व्हा.चेअरमनचा सन्मान(सत्कार)केला.
दि.२६ जुलै रोजी संपन्न झालेल्या निवडणुकीत शेतकरी सभासदांनी गत ३०,३५ वर्षापासून सत्तेत असलेल्या मुळे मामांच्या सत्तेला 'सुरुंग' आणि विना सहकार नही उद्धार, असे म्हणत विवेकजी सुकणे यांच्या बळीराजा विकास पॅनलला विजयी 'गुलाल' लावला.
एकञ येऊ,पुढे जाऊ आणि सुकणी येथील शेतकरी सभासद मतदारांचा विकास करु.हे ब्रीद घेऊन नुतन मंडळ आगामीकाळात काम करणार आहे.असे नुतन चेअरमन विवेकजी सुकणे यांनी म्हटले तसेच समस्त ग्रामस्थांचे आभार ही मानले.


0 टिप्पण्या