प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भद्रावती तालुक्यातील बेलगाव (भु.)येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आमचा गाव बेलगाव मित्र समूहातर्फे गावातील सातवी, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक जी .एस .पाच भाई व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन बाविस्कर यांनी संयुक्तपणे तर ग्रामपंचायतचे ध्वजारोहण प्रशासक भारती सुनिल आगलावे यांचे हस्ते पार पडले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन शेषराव बाविस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत प्रशासक भारती सुनील आगलावे ,माजी उपसरपंच जयेंद्र मगरे, मुख्याध्यापक जी .एस. पाच भाई ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गण ग्रामपंचायतचे माजी सदस्यगण ,से.नि. मुख्याध्यापक वासुदेव आसेकर,से.नि. मुख्याध्यापक गजानन घुमे ,सुरेश वरघणे, रमेश आसेकर ,सुधाकर उज्वलकर, ग्राम विकास अधिकारी तिडके प्रामुख्याने उपस्थित होते .
आपल्या स्व- गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणात स्पर्धा निर्माण व्हावी, त्यांनी उत्तम गुण पटकावेत ,त्यांची स्वप्ने जागवावीत आणि मनोबल वाढावे याकरिता मित्र समुहातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. आमचा गाव बेलगाव मित्र समूहाच्या वतीने या कार्यक्रमात इयत्ता सातवीतून गिरीश सुधाकर वाभिटकर ,इयत्ता दहावीतून कु .सावरी अनिल आगलावे आणि इयत्ता बारावीतून अनुप हनुमान डाखरे या गुणवंतांचा अभ्यास पूरक पुस्तके , रोख रुपये 500 आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात देशभक्तीपर गीते ,विद्यार्थ्यांची भाषणे, कवायत झाली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पाचभाई सर, संचालन जीवतोडे सर तर आभार प्रदर्शन अलोणे मॅडम यांनी केले .खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शालेय मंत्रिमंडळ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या