Ticker

6/recent/ticker-posts

प्रवासी निवारा तेढा रोड बसस्टँडसमोरील साचलेल्या पाण्याची समस्या दूर


कच्ची नाली तयार करून दिला दिलासा; परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती समितीचे समाजकार्य

चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोंदिया:-गोरेगांव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील प्रवासी निवारा, तेढा रोड बसस्टँडसमोर अनेक दिवसांपासून पाणी साचत असल्याने विद्यार्थी, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. बस उभी करतांना साचलेले पाणी उडून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडत असल्याने त्यांचे कपडे खराब होत होते. तसेच साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.
ही समस्या *परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्त समिती, मुंडीपार* यांच्या निदर्शनास आल्यानंतर समितीने समाजहिताला प्राधान्य देत दि. २२ ऑगस्ट रोजी स्वतः श्रमदान करून साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कच्ची नाली तयार केली. नाली तयार केल्यामुळे साचलेले पाणी बाजूला वाहून जाऊ लागले असून परिसरातील रस्ता स्वच्छ व सुरक्षित झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

समितीच्या पुढाकाराने श्रमदानातून काम पूर्ण

परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती समितीच्या सदस्यांनी स्वतः उपस्थित राहून श्रमदान केले. कच्ची नाली तयार करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती समितीचे अध्यक्ष मनोहर राऊत, 
गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गेवेंद्र भगत, 
बुधराम सिंदीमेश्राम, मधुकर पटले, 
सुरेश राऊत, केशवराव राऊत, 
तसेच समितीचे सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते शंकर वैद्य, प्रल्हाद कटरे, रत्नपाल राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष मनोहर राऊत यांनी सांगितले की, समाजातील लहान वाटणाऱ्या समस्या नागरिकांसाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांची सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन समितीने हे काम स्वतःच्या श्रमदानातून केले असून समाजहिताची अशी कामे पुढेही सुरू ठेवण्यात येतील.
नागरिकांना मिळाले विविध फायदे
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास सुविधा झाली असून बस उभी करताना पाणी उडण्याचा त्रास कमी झाला आहे. प्रवासी व स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असून रस्ता अधिक स्वच्छ आणि सुरक्षित झाला आहे. साचलेल्या पाण्यामुळे निर्माण होणारा आरोग्याचा धोका कमी होण्यासही मदत झाली आहे.
श्रमदानातून करण्यात आलेले हे कार्य सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले असून यामुळे गावात एकता, विश्वास आणि सामाजिक जागरूकता वाढीस लागण्यास मदत झाली आहे. समाजहितासाठी अशी सेवा आणि कार्य कायम सुरू ठेवण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला.

परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती समिती, मुंडीपार यांच्या या समाजोपयोगी कार्याचे ग्रामस्थांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या