टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन तर्फे
स्वातंत्र्य दिन देशभक्तीपर गीतांनी संपन्न
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :- " आज भारत एक शक्तिशाली आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे,स्वातंत्र्यासोबतच देशाची शांतता आणि सुरक्षितता राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. देशातील गरिबी,अशिक्षितता आणि भ्रष्टाचार नष्ट करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्य दिन आपल्याला देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेण्याची संधी देतो. आपल्या सीमेवर अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाने देशाच्या कायद्याचा,नियमांचा आणि संविधानाचा आदर केला पाहिजे."असे विचार साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
" ते टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन, अमरावती "तर्फे 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी रुक्मिणी नगर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले होते तर प्रमुख अतिथी टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वऱ्हेकर,उपाध्यक्ष तेजस दुमाने,कोषाध्यक्ष मारुती तांबट,सचिव संजय काळे, सहसचिव अमोल बांबल होते .
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते स्वातंत्र्य देवीचे पूजन करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुण बुंदेले यांनी अध्यक्षीय भाषणानंतर 'स्वातंत्र्य दिन' या स्वरचित क्रांती गीताचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले यांनी टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा स्वलिखित 'अभंग तरंग' 'निखारा' व 'दारूनं मेला व माय' ही पुस्तके देऊन स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार केला.
"प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने प्रामाणिकपणे कार्य केले तर देशसेवा घडू शकते."
- नितीन वऱ्हेकर
" प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने प्रामाणिकपणे कार्य केले तर देशाची सेवा आपोआपच घडू शकते.सर्व मेकॅनिक बंधूंनी असोसिएशनचे सभासद झाले पाहिजे.असोसिएशनशी जोडल्यामुळे एखाद्या सदस्यावर संकट आले तर ते निवारण्याचे कार्य असोसिएशन करू शकते.
कार्य करताना काही प्रॉब्लेम आल्यास त्यांचे प्रॉब्लेम सॉल होऊ शकतात म्हणूनच अमरावती शहरांमधील सर्व मेकॅनिक बंधूनी
असोसिएशनचे सदस्य झाले पाहिजे.15 ऑगस्ट,26 जानेवारी या राष्ट्रीय सणांसोबत इतरही कार्यक्रम आपण असोसिएशनमुळे घेऊ शकतो.स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥" असे विचार असोसिएशनचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी नितीन वऱ्हेकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त गायक मारुती तांबट,अश्विन चौधरी,योगेश शिंदे यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी सदस्य अमोल देवळे,विजय चौधरी, किशोर काळे,साहिल सरपे, रोशन धोटे,हरमेश थिटे,योगेश शिंदे,गोपाल गणोरकर,मुन्ना गुप्ता,विजय मारोटकर,भूषण गासे,गणेश तांबट,राजेश सावळकर,गजानन पांडव, योगेश भैरूवाले,प्रशांत महल्ले,गजानन चौधरी, विशाल सुरोशे,महेश देशमुख, विशाल शाहू,राहुल गुल्हाने तथा असोसिएशनचे बहुसंख्य सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन योगेश शिंदे तर आभार अश्विन चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहारने झाली.


0 टिप्पण्या