( अध्यक्षांच्या हस्ते अहवालाचे विमोचन,सदस्यता - आपदा मित्र प्रमाणपत्र, पल्स ऑक्सिमीटरचे व ओळखपत्राचे वितरण महिलांचा सन्मान, राष्ट्रगीतांनी रेड क्रॉस आमसभेची सांगता.)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :- इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा- भंडारा ची वार्षिक सर्वसाधारण सभा *जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह भंडारा जिल्हाधिकारी व अध्यक्ष श्री सावंनकुमार यांचे अध्यक्षतेत, राजेंद्रकुमार*जाधव उपजिल्हाधिकारी, डॉ.अशोकराव ब्राह्मणकर चेअरमन डॉ.नितीन तुरसकर मानद सचिव, डॉ. विशाखा*गुप्ते यांचे उपस्थितीत पार पडली.
सभेत वर्ष *2022 ते 2025* पर्यंतचा *वार्षिक ताळेबंद आढावा सादर करण्यात* आला. माननीय अध्यक्षांसह उपस्थित सदस्यांकडून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. तसेच आगामी जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षांच्या अनुमती करिता पाठविण्यात येईल असे ठरले. माननीय *अध्यक्ष श्री सावंत कुमार यांच्या हस्ते* जेन हेंरी ड्युआंट आंतरराष्ट्रीय पुरस्कार नॉमिनी करिता प्रीतमकुमार राजाभोज, आसगाव पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उत्कृष्टरित्या काम करणारे जेष्ठ नागरिक सेवकराम शाहू यांचा तसेच रेड क्रॉस आजीवन सदस्यता, आपदा मित्र प्रमाणपत्र, पल्स ऑक्सिमीटर, ओळखपत्र देऊन महिला -( बेटी- नारीचा ) पुरुषांचा सन्मान करण्यात आला.
*वार्षिक सभेला अध्यक्षीय संबोधन श्री*मा.जिल्हाधिकारी भंडारा*प्रस्ताविक डॉ.अशोकराव*ब्राह्मणकर चेअरमन,अहवाल वाचन डॉ. नितीन तुरसकर सचिव,सूत्र संचालन राजू खवसकर* *सदस्य,आभार हेमंत चंदावसकर यांनी केले.*
संपूर्ण भंडारा शहर व जिल्ह्यातील खेडे गावातील बहुसंख्य ज्येष्ठ सदस्य यात प्रा. वामन तुरीले सर, डॉक्टर जयंत गिरीपुंजे, श्रीमती सुमन अराठे, ज्येष्ठ महिला सदस्य अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त श्रीमती मिरा भट्ट,एड. कीर्तीमाला जैस्वाल, इतिहासकार सईद शेख, मुकुंद खवसकर सेवानिवृत्त नायब तहसीलदार,धनंजय मुळे साहित्यिक, सेवकराम शाहू, चंदूजी वंजारी, डॉ. सुखदेव काटकर पत्रकार, सदाशिव बनसोड माजी सैनिक,पत्रकार विलास केजरकर, पत्रकार नवीन निश्चल येनोरकर, डॉ.रुद्रसेन भजनकर, एड. रत्नेश कोहरू,सामाजिक कार्यकर्ता दिनेश पंचबुधे,सरपंच (सानगडी) सौ.सविता उपरीकर,संगीता डहाके, नम्रता बागडे,श्वेता शिंगाडे,पद्मा खबसकर, रोशनी पडोळे, मीनल लिमजे, रोशना कवाने, रितू पसीने, दुर्गा गोल्लर,नेहा मोटघरे,शितल बोरसरे,प्रा. प्रेमलाल लांजेवार, गुलाब डोये, वासुदेव निर्वाण,पुरुषोत्तम गूल्लानी, समीर नवाज, मेहमूद खान, अरुण भेदे, विलास मुळे, मुकुंदा वंजारी, के.डी. बारस्कर,के.जे. राऊत हे उपस्थित होते.
वार्षिक सभेचे उत्कृष्ट आयोजन- नियोजन डॉ. नितीन तुरसकर, ज्येष्ठ महिला सदस्य मीरा भट्ट, हेमंत चंदवासकर, राजू खवसकर, प्रीतम कुमार राजाभोज, संगीता डहाके, डॉ. रुद्रसेन भजनकर यांनी केले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
(प्रेषक:डॉ नितीन तुरसकर )


0 टिप्पण्या