चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-दि. ०२/०८/२०२६ रोजी रविवारी, सेवावस्ती मेंढा (भंडारा) येथे, मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. आमगांव समाज जागृती प्रतिष्ठान, सेवांकुर प्रकल्प नागपूर, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दि सेवा समिती चंद्रपूर, भृशुंड गणेश मंदिर देवस्थान, भंडारा, यांच्या संयुक्त विद्यमाने, सदर आरोग्य शिबिर घेण्यात आले. रुग्णांना मोफत रोग निदान, वैद्यकिय सल्ला, समुपदेशन, औषधी वाटप करण्यात आले. सर्व रुग्णांची नाडी परिक्षा, बी. पी. तपासणी करण्यात आली. प्रशिक्षित डॉक्टर्स, रुग्ण, सहकारी वर्ग यांना आरोग्य प्रबोधन करण्यात आले.
डॉ. संजय मानकर यांनी प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ डॉक्टर्स, केमीस्ट व सहकारी वर्गास, ऑगस्ट महिन्यातील आरोग्य दिन विशेष, आरोग्य सप्ताह व आरोग्य पंधरवडा याबद्दल सविस्तर, आरोग्य उद्बोधन केले. दि. १ ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान प्रसार दिवस व सप्ताह, तसेच दि. १ ते ७ ऑगस्ट राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिन व सप्ताह, जागतिक फुप्फूस कर्करोग दिवस, गॅस्ट्रोपेरेसिस जनजागरण महिना ऑगस्ट, हृदय प्रत्यारोपण, दि. ३ ते १५ ऑगस्ट अवयवदान पंधरवडा, सांधेदुखी, जेष्ठ नागरीकांना होणारे शारीरिक व मानसिक आजार, पावसाळ्यात होणारे आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय योजना, कुत्रादंश (Dog Bite) सर्पदंश (Snake Bite) इ. बद्दल सविस्तर माहिती दिली.
मा. दलजितसिंह गुरुचरण सिंह खालसा (विभाग संघचालक), मा. अनिलजी मेहर (जि. सहसंघचालक) श्री. अविनाशजी नागोसे (जि. सेवाप्रमुख), श्री. वारालजी जीवतोडे (नगर सेवा), इ. व्यक्तींनी आरोग्य शिबीरास भेट देवून समाधान व्यक्त केले.
औषधी व्यवस्था श्री. राहूलजी जिवतोडे, औषधी वितरण कु. चित्रा अरविंद पवनकर, श्री. स्वप्निल येवले, रुग्ण नोंदणी श्री. सागर उजवणे, बैठक व्यवस्था श्री. शशिकांत हजारे सर यांनी सांभाळली, सहकारी स्वयंसेवकानी मोलाचे सहकार्य केले.
नगर सेवा प्रमुखांनी सर्वश्री डॉ. संजय मानकर, परिक्षित शिंदे, भुषण रहांगडाले व सहकारी वर्गाचे आभार मानले.
टाकळी सेवावस्ती व मेंढा सेवावस्ती या परिसरात, नियमितपणे आरोग्य शिबीरांचे आयोजन व व्यवस्थापन करण्यांत येत आहे.


0 टिप्पण्या