Ticker

6/recent/ticker-posts

साकोली-सेंदूरवाफा शासकीय बोळीवर अतिक्रमणांचा सपाटा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-शहरातील पाण्याचे जलस्तोत्र म्हणजे पाणवठे. असे अनेक पाण्याचे जलस्तोत्र बुजवून शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही यावर कारवाई का होत नाही ? असा संतापजनक प्रश्न नागरिकांनी केलेला आहे ? या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी सेंदूरवाफा-साकोली प्रभाग ०५, ०४ येथील नागरिकांनी केली आहे. भविष्यात नैसर्गिक जलस्तोत्र साधने कायम रहावे याकरिता शासन प्रयत्न करणार काय ? हा एक नवा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे. शहरातील अनेक शासकीय जागेवर बोळी, पाणवठे हे निसर्ग निर्मित तयार आहेत. प्रभाग क्र. ०५ मधील शासकीय गट क्र. ४०३ या पाणी जलसाठा असलेल्या बोळीत अज्ञात व्यक्तींनी चक्क तार कंपाऊंड टाकून अतिक्रमण करण्याचा नियमबाह्य प्रकार समोर आलेला आहे. अशाप्रकारे शासकीय भूखंड असलेल्या बोड्या बुजविल्या तर जनावरांना पाणी मिळणार का ? असा प्रश्न गावातील सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
______________________________________________

शहरातील जलसाठा बुजविण्यासाठी कुणी नियम तोडत असेल तर त्यांवर नगरपरिषद वतीने कायदेशीर नोटीस बजावली जाईल. जलसाठा कायम राखणे ही भविष्यासाठी गरज आहे. 

देवश्री मनिष कापगते.
नगराध्यक्ष साकोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या