( सईद शेख यांची अध्यक्ष म्हणून निवड)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-"ओळख "प्रकाशक मंडळ कार्यकारणीच्या प्रथम सभेला मोहम्मद सईद शेख इतिहास संशोधक,समाजसेवी तथा संस्थापक ग्रीन हेरिटेज संस्था, अध्यक्षस्थानी होते तर एडवोकेट श्रीमती कीर्तिमाला जयस्वाल(संचालिका रबड़ीवाला मौदा) समाजसेवी श्रीमती मीरा भट्ट(तुमसर )डॉ.रुद्रासिंग भजनकर,मुकुंदा वंजारी (संचालक गायत्री राईस मिल खरबी) विक्की डोईफोडे (समाजसेवक) यांची अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
ओळख या विदर्भ महाग्रंथाची संकल्पना,संचालन व प्रस्ताविक साहित्यिक राजू खवसकर,आभार डॉक्टर रुद्रसेन भजनकर यांनी मानले.
विदर्भाच्या भूमीत आपापल्या परीने सामाजिक कार्यात चढाओढीने भाग घेणाऱ्या सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,सांस्कृतिक, पत्रकारिता,कलावंत तसेच शासकीय सेवेत राहून समाजाप्रती सकारात्मक भावना व समाजाला पुढे नेण्याकरिता ज्या विभूतींनी योगदान दिले आहे अशांना विदर्भाच्या पृष्ठभूमीवर नेण्याकरिता *ओळख*या सामाजिक चळवळ महाग्रंथ प्रकाशक समितीच्या प्रथम सभेला जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्याचे प्रतिनिधी हजर होते.
"ओळख" हा महाग्रंथ अप्रतिम,अभूतपूर्व व उल्लेखनीय मार्गदर्शक ठरेल अशी सर्वांनी अपेक्षा मांडली. तसेच प्रकाशक मंडळाची कार्यकारणी घोषित करण्यात आली.
यात ओळख विदर्भ सामाजिक चळवळ महाग्रंथ प्रकाशक मंडळाची खालील कार्यकारिणी सर्वांनी मंजूर केली.
*अध्यक्ष* मो. सईद शेख (इतिहास संशोधक,समाजसेवी संस्थापक ग्रीन हेरिटेज संस्था भंडारा)
*कार्याध्यक्ष* डॉ. नितीन तुरसकर सर्जन,प्रगत शेतकरी
*उपाध्यक्ष* चिंधुजी वंजारी श्रीमती मीरा भट्ट ,एडवोकेट कीर्तीमाला जयस्वाल,मीना भागवतकर,डॉ.विजय ठक्कर
*सचिव* राजू खवसकर साहित्यिक *कोषाध्यक्ष* डॉ. रुद्रसेन भजनकर *सहकोषाध्यक्ष* अमोल माणूसमारे *संपादक* धनंजय मुळे,दिनेश पंचबुधे,श्वेता सिंगाडे
*प्रसिद्धी प्रमुख* दयाळनाथ नानवटकर,नवीन निश्चल येनोरकर,नम्रता बागडे,योगेश बावणे
*मार्गदर्शक राजेश* गडरिये, सेवकराम साहू
*महिला प्रतिनिधी* आंचल मेश्राम,संगीता डहाके
*विशेष सन्मानित पाहुणे* विदर्भातील खासदार,आमदार, मंत्री यांचे सह अभिनेत्री वर्षा शिंगणे,श्रीमती सुमन अराठे,प्रा.वामन तुरीले सर,डॉक्टर रश्मी गुप्ता व सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष
*सदस्य* वासुदेव निर्वाण,गुलाब डोये.
सभेचे उत्कृष्ट आयोजन गायत्री राईस मिलचे संचालक चिंधुजी वंजारी,सौ मीनल वंजारी, सौ.लता वंजारी यांनी केले. सभेला सर्वस्वी नवीननिश्चल येनोरकर पत्रकार,रिजवान शेख,श्रीमती सुमन अराठे, लता वंजारी, आचल मेश्राम, वासुदेव निर्वाण, गुलाब डोळे सेवकराम शाहू, विकी डोये,राजेश गडरिये, अमोल माणूसमारे,राजू सुपारे इत्यादी उपस्थित होते.
प्रेषक:राजु खवसकर (साहित्यिक/सदस्य रेड क्रॉस सोसाइटी भंडारा)


0 टिप्पण्या