चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुडमापुरी येथील विद्यमान शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ दिनांक ०३ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण झाला आहे. या निमित्ताने, मावळत्या (जुन्या) शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या कार्यकाळात शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल सभेमध्ये त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE 2009) नुसार नवीन समिती गठित करण्यासाठी दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व सदस्यांची निवड ही *बिनविरोध* करण्यात आली.पालकांमधून निवड झालेली नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समिती खालीलप्रमाणे आहे. नरेंद्र केशवजी घरत (अध्यक्ष), पद्मा रामेश्वर ढोक (उपाध्यक्ष) समिती सदस्य प्रदीप दादूजी गराडे,.चित्रकला राजरत्न घरत, पौर्णिमा धर्मेंद्र तागडे, संजय अमृत मौजे, प्रेमलाल नारायण सावसाकडे, अनुरता हिवराज कापगते, हेमलता विनोद चौधरी, संघर्ष सेवकराम उंदिरवाडे (शिक्षणतज्ज्ञ),राजकुमार डोमा पारधी (शिक्षक सदस्य), स्थानिक प्राधिकरण, डी. डी.वलथरे मुख्याध्यापक (सचिव). आजची निवड प्रक्रिया नरेश राऊत सरपंच यांचे अध्यक्षतेखाली, पालक वर्ग यांचे प्रमुख उपस्थितीत व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या मोलाच्या सहकार्याने अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये पार पडली.


0 टिप्पण्या