चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालय अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत सदर कार्यक्रम जमनापूर या गावातील ग्रामीण परिसरात घेण्यात आला. सदर कार्यक्रम जमनापूर गट ग्रामपंचायतच्या सरपंच पूजा देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडला. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून जमनापूर गट ग्रामपंचायतचे उपसरपंच रवींद्र गडपायले तथा ग्रामपंचायत सदस्य गणेश टिकेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. वृक्षारोपण कार्यक्रम प्रा. डॉ. चंद्रशेखर चकोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रा. भोजराज सातपुते, प्रा. संजय आकरे, प्रा. दिपाली विठ्ठले, प्रा. गीतांजली गडपायले यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या वृक्षारोपण उपक्रमाला बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आतिश शहारे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. संतोष गोटेफोडे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनीसह महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी रवि लांजेवार, जयेंद्र कऱ्हाडे, राजू आवरकर, निलेश बडोले, अतुल गणवीर यांचे परिश्रम लाभले.


0 टिप्पण्या