Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पोलिसांच्या 'रडारवर' गुटखा विक्रेते..

हंडरगुळी येथील गुटखा विक्रीवर धाड;
आरोपी फरार..
——————————

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखुजन्य पदार्थांची वाहतूक,विक्री व साठवणूक करणा-या व्यक्तीविरुध्द उदगीर तालुक्यातील वाढवणा बू. पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले असून गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्रेत्यांविरुध्द आता वाढवणा पोलिस 'अक्शन मोडवर' तसेच 'ग्राउंडवर' आले असल्याचे दि.२५-८-२६ रोजी हंडरगुळीत टाकलेल्या धाडीवरुन दिसून आले.               या धाडीत २२५० रु.चा गुटखा तथा सुगंधीत तंबाखु हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. माञ,पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अवधूत (अवी) विठ्ठल येरावार रा.हंडरगुळी हा फरार झाला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असून तो लवकरच सापडेल.अशी माहिती कर्तव्यदक्ष सपोनी.सुनील गायकवाड व पोउपनी. प्रवीण हालसे यांनी दिली.         
— याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,दि.२५-८-२६ रोजी मिळालेल्या माहितीवरुन सपोनी.सुनील गायकवाड हेकाॅ.शिवप्रताप रंगवाळ, पोकाॅ.संभाजी गाडगे यांनी सहका-यांसह दि. २५ दु.४.२० वा.सुमारास महादेव मंदीर हंडरगुळी लगत असलेल्या साईनाथ किराणा दुकाणात धाड टाकली असता राज्यात बंदी असलेला व मानवी शरीरास अपायकारक असलेला विमल गुटखा स्वत:च्या फायद्यासाठी विकला जात असल्याचे निदर्शनास आले असून या धाडीत १८०० रु.चा विमल पान मसाला १५ पुडे तसेच ४५० रु.चा व्ही-१ तंबाखु १५ पुढे असा एकुण २२५० रु.चा मुद्देमाल मिळून आला. अशी फिर्याद ९६५ पोकाॅ. संभाजी बाबुराव गाडगे यांनी दिल्याने गुरनं-२६२/ २६ कलम-१२३/२२३, २७४,२७५,६२ बीएनएस सह कलम-५९अध्ययंतरी अधिनियम-०६ अन्वये पो.स्टे.वाढवणा बू.येथे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी.सुनील गायकवाड हे करत आहेत.
— गत कांही दिवसापासून वाढवणा पोलिसांनी 
२ नं.अवैध धंद्याविरुध्द मोहीम तीव्र केली असल्याने दोन नंबरच्या धंदेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असलीतरीही अजुनही त्या २ तस्करांकडून बाबा रत्ना-१२०,ब्लॅक बाबा इ. गुटखा व सुगंधीत तंबाखु किरकोळ विक्रेत्यांना एका 'मिस्ड काॅलवर' राञीबेराञी,पहाटे पुरवठा केला जातोय.अशी चर्चा मंदीरपरिसरात महिला, पुरुषांत हळूवार आवाजा मध्ये होतेय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या