चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प साकोली (बीट - खांबा) अंतर्गत अंगणवाडी केंद्र वडेगांव/शंकरपुर येथे सोमवार ‘नवचेतना व आधारशिला’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून बालक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी गहाणे तर प्रमुख पाहुणे माजी सरपंच सुनिता चोपकर, माजी तं. मु. अध्यक्ष नाजूक कटरे, आरोग्य परिचारिका लता श्रीरामे व आरोग्य सेविका मनिषा पंधरे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच माधुरी गहाणे व प्रमुख पाहुणे माजी तं.मु. अध्यक्ष नाजूक कटरे यांनी आपल्या भाषणात ‘नवचेतना व आधारशिला’ या उपक्रमाचे महत्व सांगून बालकांचा सर्वांगीण विकास आणि त्यात पालकांची भूमिका या विषयावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. ० ते ३ वयोगटातील बालकांसाठी ‘नवचेतना’ तर ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी ‘आधारशिला’ या उपक्रमांतर्गत पोषण मटका तयार करून सभोवताल पाच उदिष्टे व सहा सेवांचे फलक लावून शैक्षणिक व मनोरंजन असे विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वडेगांव केंद्र अंगणवाडी सेविका कोकीला मेश्राम व सूत्र-संचालन शंकरपुर केंद्र अंगणवाडी सेविका रंजू सोनवाने तर आभार प्रदर्शन वडेगांव केंद्र अंगणवाडी मदतनीस कविता बोंबार्डे यांनी केले.


0 टिप्पण्या