Ticker

6/recent/ticker-posts

डास उत्पत्तीस्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मोझरी :कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचा उपक्रम माझं गावं आरोग्य संपन्न गावं अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ठाकूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.जुबेर अली यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत डास उत्पत्तीस्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम राबविण्यात आली.
हिवताप,हत्तीरोग,डेंग्यू व चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी गावातील विविध कायमस्वरूपी व तात्पुरत्या डास उत्पत्तीस्थानांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले.जैविक पद्धतीने डास नियंत्रण कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी जैविक नियंत्रण पद्धतीअंतर्गत अळीभक्षक गप्पी माशांचा वापर केला जातो.साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्या खात असल्यामुळे डासांची संख्या व घनता कमी करण्यास मदत होते.
डासांच्या अळ्यांचे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी गप्पी माशांचा वापर हा हिवताप व हत्तीरोग नियंत्रणाच्या उपाययोजनांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती कमी करून डासजन्य आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पारिसे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी,हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अक्षय कलंत्री आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.जुबेर अली यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
यावेळी आरोग्य निरीक्षक विठ्ठल राठोड,अतुल वानखडे आरोग्य सहायिका सुनदा राऊत, हरीश कठाने,वंदन आडे,रोशन खरकाळे,अनिकेत हिवरकर,हिमांशू मुदगल,विनीत तवर,अझर खान,तिजारे,उके,बाविस्कर वाकोडे,दाभाडे व करुले यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी गप्पी मासे धडक मोहिम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग व सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या