Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा खुर्द येथील भाषण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना रऊफ शेख मित्र मंडळा च्या वतीने रोख स्वरूपात बक्षीसाचे वाटप


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वाढवणा :-उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द तालुका उदगीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 66 विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त  भाषण स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. एवढ्या मोठ्या संख्येने भाषण स्पर्धेत विद्यार्थी प्रथमच सहभागी झाले होते, त्यामुळे भाषण स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना रऊफ शेख मित्र मंडळाच्या वतीने रोख स्वरूपात शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोख स्वरूपात बक्षीसाचे वितरण करण्यात आले.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किशनराव भिंगोले गुरुजी, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर भांगे,  उपाध्यक्ष संदीप पाटील, पोलीस पाटील प्रमोद मद्देवाड, सदस्य प्रमोद पाटील, वसंत लादेकर, व्यंकट भांगे, अशोक पाटील, रिजवाना अमजद पठाण, वनिता बालाजी गोटमुकले, अंजली परशुराम ढवळे, वंदना महेंद्र सोमवंशी, आदीसह शाळेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर भाषण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जाधव सर यांनी केले.
 तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी सर यांनी केले, तर आभार कुरेशी सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या