Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा जिल्हा सेवानिवृत कल्याणकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

(70 वर्ष पूर्ण केलेल्या व नवीन सभासदांचे सत्कार)


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-भंडारा जिल्हा सेवानिवृत्तांची कल्याणकारी संस्था भंडारा च्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा सन _2025 _26  नुकतीच सार्वजनिक वाचनालय, गांधी चौक भंडारा येथे पार पडली.
या सभेत कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून श्री नीळकंठ  साखरवाडे,उपाध्यक्ष व सचिव गुलाब साठवणे, सहसचिव श्री जाधवराव साठवणे, कोषाध्यक्ष श्री गणेश भांगे इत्यादि मान्यवर सह सदस्य सहादेव मेश्राम, डॉ. संजय मानकर, तुलाराम  साकुरे,गणराज दोनाडकर ,प्रा.प्रेमलाल लांजेवार, नागोराव मोथारकर,गिरीश मुठमारे ,श्रीमती बिना उजवणे ,सौ.स्मिता भांगे, इत्यादि  या प्रसंगी उपस्थित होते. 
प्रथम सरस्वती स्तवन ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सौ स्मिता भांगे यांनी स्वागत गीत म्हटले.पुष्पगुच्छ देवून मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कोषाध्यक्ष गणेश भांगे यांनी सादर केले तर अहवाल वाचन उपाध्यक्ष व सचिव श्री गुलाब साठवणे यांनी.
      या वर्षी वयाची 70 वर्षे पूर्ण केलेल्या सभासद सर्वश्री जाधवराव साठवणे, रामदास डोकरीमारे,माधव फसाटे,सौ.मंदा गोंडाणे,शैलेंद्र कटरे, प्रेमलाल लांजेवार,श्रीमती कल्पना व्यवहारे, डॉ.रंजीत कटकवार,भाऊराव देशमुख, सौ. अर्पणा उमाळकर,शंकर चांदेवार,सुखदेव चामट,देवीदास वंजारी,आणि नवीन सभासदांमध्ये सौ.कुंदा खापेकर,अतुल वर्मा,पुरुषोत्तम समरीत,संजय पडोळे,देवीदास देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, डॉ.परमानंदजी बागडे,डॉ.निनाद कोरडे,श्रीकृष्ण हटवार,सुधाकर शेंदरे,सुरेश साठवणे,रमेश गिरेपूंजे,नरेश निमकर,अर्जुन देशमुख, विजय शेंदरें इत्यादींचे टॉवेल,नारळ व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आले.अतुल वर्मा,डॉ. निनाद कोरडे,माजी नगराध्यक्ष श्री रामदासजी शहारे, सौ. अपर्णा उमाळकर इत्यादिनी कार्यक्रमा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्र संचालन प्रा.प्रेमलाल लांजेवार यांनी केले तर आभार श्रीमती बिनाताई उजवणे यांनी मानले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या