प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील पोहा गावामध्ये आज दि. 24/08/2026 रोजी तहकूब ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत मागील वर्षांपासून ग्रामपंचायतीत किती निधी आला आणि तो निधी कुठे वापरला गेला, याचा आराखडा द्या, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. मात्र प्रश्नांची उत्तरे न देता ग्रामसेवक आणि सरपंच सभा सोडून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तहकूब ग्रामसभेसाठी ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल खंगार यांची निवड करण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवक येंचलवार साहेब व सरपंच मायाताई झाडे उपस्थित होते.
ग्रामसभेत गावातील नागरिकांनी मागील पाच वर्षात किती निधी आला, तो कुठे गेला आणि गाव विकासासाठी ग्रामपंचायतीकडे एकूण किती पैसे जमा आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र या प्रश्नांची उत्तरे न देता ग्रामसेवक येंचलवार आणि सरपंच मायाताई झाडे मध्येच ग्रामसभा सोडून निघून गेले.
त्यानंतर ग्रामसभेचे अध्यक्ष राहुल खंगार, ग्रामपंचायत सदस्या सखुताई चौधरी आणि गावातील नागरिक मात्र तिथेच बसून राहिले.
काही दिवसांपूर्वी या गावात पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट लावण्यात आला होता, त्याकडेही ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
सरपंचांना काही प्रश्न विचारले असता त्यांचे पती अरविंद (तात्या) झाडे हे प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून त्यांच्यावर सक्त कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
या तहकूब ग्रामसभेला पोलीस पाटील शेखर टापरे, ग्रामपंचायत सदस्या सखुताई चौधरी, प्रदीपपाल महाराज चौधरी, राहुल झाडे, राजू रोडे, प्रशांत वाढई, जगदीश रोडे, बंडूजी तपासे, राकेश रोडे, राहुल खंगार, प्रमोद तपासे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या