चित्रा न्युज प्रतिनिधी
मोर्शी- अवयव दानाचे प्रमाण वाढावे व अवयव दानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे तसेच समाजामध्ये या विषयाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन घडविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत विशेष मोहीम अंतर्गत 16 वा भारतीय अवयव दान दिन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम उपजिल्हा रुग्णालय मोर्शीचे वैद्यकीय अधिक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत अवयव दान पंधरवडा ही एक चळवळ म्हणून राबविण्यात येत आहे या कालावधीत व्यापक जनजागृती व समाजाला सोबत घेऊन उपक्रम राबविले जाणार आहेत.
या मोहिमेचे उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भुंबर यांनी केले तसेच सूत्रसंचालन व अवयव दान शपथ परिसेविका वर्षा दारोकार यांनी दिली यावेळी रुग्णालयातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी रुंद हजर होते.


0 टिप्पण्या