Ticker

6/recent/ticker-posts

Geeta for Kids' पुस्तकाचे प्रकाशन; लेखिका रुचिरा दाभाडे यांचा मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :Richaa's Geeta Classes च्या संस्थापिका श्रीमती रुचिरा दाभाडे लिखित Geeta for Kids"या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बालसाहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना Pen of Excellence व "उभरती लेखिका"या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला श्रीमंत मुधोजी राजे भोसले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. मुस्ताक पठाण आणि डॉ. सुलक्षणा भुयार यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखालील गोजिरी निनावे, स्वरा गेडाम, सारांश गेडाम, सिया तामण, प्रथा दावडा आणि श्री डुकरे या विद्यार्थ्यांनी भगवद्गीता पठणासाठी India World Record प्राप्त करून संस्थेचा गौरव वाढविला आहे.
SP श्री. लोहित मतानी यांनी "Geeta for Kids"पुस्तकाचे कौतुक करत श्रीमती दाभाडे यांना स्वतःच्या हस्ताक्षरात (Handwritten Note) प्रेरणादायी शुभेच्छा पाठविल्या. तसेच पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांनीही पुस्तकाचे कौतुक करून बालकांमध्ये संस्कार आणि भारतीय संस्कृती रुजविणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.

"Geeta for Kids"हे पुस्तक लहान मुलांना भगवद्गीतेची ओळख सोप्या आणि संस्कारक्षम पद्धतीने करून देणारे असून, उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या