चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-महाराष्ट्र जेष्ठ नागरीक महासंघ फेसकाॅम मूंबई, संलग्न भंडारा जिल्हा जेष्ट नागरिक मंडळ भंडारा जिल्हा शाखेच्या विद्दमाने जागतीक आदीवासी दिवस कार्यक्रम दि. ११.८.२०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. जाधवराव साठवणे यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री. हिरामण लांजेवार सचिव, श्री. अजाबराव चिचामे कार्याध्यक्ष, श्री. रतन सुखदेवे उपाध्यक्ष, श्री. रमाकांत पशिने सहसचिव, श्री.डाँ. संजय मानकर सल्लागार, श्री. प्रेमलाल लांजेवार, श्री अरुण लुटे, श्री. पुंडलीक निखाडे, श्री. रामकृष्ण माहूले,श्री. चुडामन भूरे, श्री. आनंदराव कोहळे सदस्य, श्री. माणिक घोडीचोर, श्री . राकेश मोटघरे जेष्ट नागरिक भंडारा, यांचे प्रमूख उपस्थितीत विरंगुळा केंद्र हूतात्मा स्मारक भंडारा येथे साजरा करण्यात आला..
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जाधवराव साठवणे,
यांचे हस्ते क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री. अजाबराव चिचामे कार्याध्यक्ष, डाँ. श्री. संजय मानकर सल्लागार, ़श्री. पुंडलीक निखाडे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी , श्री.प्रेमलाल लांजेवार सदस्य यांचे हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले. व उपस्थित सर्वानी पुष्प अर्पण केले.
सदर कार्यक्रमानिमित्त मनोगत, श्री. प्रेमलाल लांजेवार सदस्य, ,श्री. रमाकांत पशिने सहसचिव, श्री. अजाबराव चिचामे कार्याध्यक्ष, श्री. हिरामन लांजेवार सचिव यांनी व्यक्त केले. डाँ. श्री. संजय मानकर सल्लागार तथा प्रमुख वक्ते, यांनी जागतीक आदीवासी दिवस निमित्त सविस्तर मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत, श्री. जाधवराव साठवणे यांनी व्यक्त केले. तसेच भंडारा जिल्हा जेष्ट नागरिक मंडळ भंडारा चे आजिवन सदस्य होण्यासाठी आवाहन केले. उपस्थिताचे आभार श्री.अरुण लुटे सदस्य यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या