सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण सोलापूर
सोलापूर :-अकलूज चे ग्रामदैवत आई अकलाई देवीच्या भंडार्यानिमित्त माळशिरस तालुक्याचे जाणते राजे मा.जयसिंहजी मोहिते पाटील( बाळदादा ) यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेने दर्शन घेतले जावे यासाठी मुस्लिम बांधवांनी प्रवेशद्वारावर सभामंडपात व मंदिरात जाण्यासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी मदत केली.व देवीचा प्रसाद अत्यंत भक्तिभावाने वाटप केला. यावेळी अकलूज मध्ये मंदिर परिसरात अतिशय सुंदर असे हिंदू मुस्लिम एकात्मिकतेचे दर्शन घडून आले.. यावेळी अकलाई देवस्थान ट्रस्टचे वतीने व मोहिते पाटील परिवाराचे वतीने माजी जि.प.सदस्या मा.स्वरुपाराणी ( दिदिसाहेब ) मोहिते पाटील यांच्या हस्ते मुस्लिम समाजाचे संग्रामनगरचे सरपंच मा.कमालभाई शेख व मुस्लिम समाजाचे नेते अँड. वजीर शेख.यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.यावेळी मुस्लिम समाजाचे राऊतनगरचे हमीद मुलाणी.सलीमभाई पठाण. तसेच मौलाभाई शेख.भैय्या माढेकर. तन्वीर तांबोळी. सलीम शेख.युन्नुस तांबोळी (सर).फारुख शेख.सलीम शहाबुद्दीन शेख.संग्रामनगरचे हमीद मुलाणी तसेच मा.तात्यासाहेब आसबे.मा.तुकाराम टिंगरे. मा.विशाल फुले.मा.विशाल मोरे मा.प्रल्हाद नवगण.मा.राजाभाऊ माने.या मान्यवरांसह बहुसंख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


0 टिप्पण्या