Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याना तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्या !

प्रदेश युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ.केशवे व कॉंग्रेस  तालुकाध्यक्ष संजय राठोड यांचे प्रशासनास निवेदन ! 

 
जयकुमार अडकिने तालुका प्रतिनिधी माहूर जि.नांदेड 9623410732 

माहूर-  दि. ०६ जुलै २०२२ ते १३जुलै २०२२ च्या अतिवृष्टी  पावसामुळे शेतीचे व शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने व नदी काठावरील शेती खरडून गेल्याने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान  भरपाई मिळणे देण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे व कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संजय राठोड यांनी माहूर तहसीलदार यांना सादर केले. प्रशासनाच्या वतीने नायब तहसिलदार व्ही.टी. गोविंदवार, राजकुमार राठोड, अव्वल कारकून शिवशंकर पवार, पुरवठा अधिकारी एस.पि. जुन्कटवार यांनी निवेदनाचा स्वीकार केला.  
       ६ जुलै ते १३ जुलै च्या अतिवृष्टी पावसामुळे माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी व विविध नाल्यांना महापूर  आल्यामुळे शेतातील उभी असलेली पिके कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद, मुग इत्यादी पिके वाहून गेली. तसेच नदीच्या व नाल्याच्या  काठावर असलेली शेती खरडून पिकांचे मोठे नुकसान झाले. उपयोगी असलेली शेती ही खरडून गेल्याने शेती ही खंडर झालेली आहे व शेतात असलेले शेतीउपयोगी साहित्य वखर, डवरे, कोळपे, सरते, तुषारसंच, विद्युत मोटरपंप, फवारणीचे पंप व इतर काही साहित्य वाहून गेल्याने व काही शेतकरी व नागरिकांची राहती कच्ची मातीची घरे पडून नुकसान झाले त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या  शेताची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून  शेतकऱ्यांना तातडीने सरसकट  नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती प्रशासनास सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष , द.म देशमुख, कॉंग्रेस तालुका प्रवक्ता जयकुमार अडकीने, नगरसेवक प्रा. विलास भंडारे, अमृत जगताप, अनिल माडपेलीवर, नगरसेवक प्रतिनिधी राजु सौंदलकर, आकाश कांबळे ,निसार कुरेशी,  युवक कॉंग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते सचिन बेहेरे,  राजु मगरे, अविनाश माडपेलीवार, समीर शेख, अविनाश कदम आदिसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या