जयकुमार अडकिने तालुका प्रतिनिधी माहूर जि.नांदेड 9623410732
माहूर- जलक्रांतीचे प्रणेते गोदाकाठचे कर्मयोगी, मराठवाड्याचे भगीरथ भारताचे माजी गृहमंत्री स्व. डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्य माहूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने माहूर शहरातील माहूरगड संपर्क कार्यालय या कॉंग्रेसच्या कार्यालयात प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संजय राठोड, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष द.म देशमुख, कॉंग्रेस तालुका प्रवक्ता जयकुमार अडकीने, नगरसेवक प्रा. विलास भंडारे, अमृत जगताप, अनिल माडपेलीवर, नगरसेवक प्रतिनिधी राजु सौंदलकर, आकाश कांबळे ,निसार कुरेशी, युवक कॉंग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते सचिन बेहेरे, राजु मगरे, अविनाश माडपेलीवार, समीर शेख, अविनाश कदम आदिसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या