सम्येक बुद्ध विहार समता भूमी गुरढा येथे आयोजन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
भंडारा :- महाराष्ट्र राज्य बुद्ध विहार समन्वय समिती आणि भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/गुरढा चे संयुक्त विद्यमाने १७ जुलै २०२२ रोज रविवार ला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत सम्येक बुद्ध विहार समता भूमी गुरढा तालुका लाखनी येथे १ दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक बुद्ध विहार समन्वय समिती ची राष्ट्रीय अध्यक्ष अशोकभाऊ सरस्वती बोधी नागपूर तर सहकारी प्रशिक्षक बुद्ध विहार समन्वय समिती चे राज्य महासचिव प्रा.घनश्याम धावर्डे, अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य बुद्ध विहार समन्वय समिती चे अध्यक्ष इन्जी. महेंद्र एन. बुद्धरत्न, प्रमुख अतिथी बुद्ध विहार समन्वय समिती भंडारा जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गजभिये, लाखांदूर चे अरविंद मेश्राम, भारतीय बौद्ध परिषद सर्कल चे माजी अध्यक्ष मिलिंद बनसोड, महाप्रज्ञा बुध्द विहार लाखनी चे अध्यक्ष सुरेंद्र lllबनसोड, त्रिरत्न बुद्ध विहार पालांदूर चे अध्यक्ष दिलीप बडोले, पालांदूर चे सरपंच पंकज रामटेके, धम्मचक्र महाबोधी बुद्ध विहार स्मारक समिती दिघोरी चे अध्यक्ष रंजीत खोब्रागडे इत्यादी मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/दगडी चे अध्यक्ष तारेश शहारे, महासचिव अनिल मेश्राम, उपाध्यक्ष दिनेश देशपांडे, कोषाध्यक्ष अजित रंगारी, संघटक नितेश देशपांडे, मार्गदर्शक आर.सी. फुल्लुके यांनी केले आहे.
अशी आहे कार्यक्रमाची रूपरेखा
सकाळी १० ते ११ वाजता उद्घाटकीय सत्र-शिबिरार्थी नोंदणी, बुद्ध वंदना, धम्मदेशना, पाहुण्यांचा परिचय, उद्घाटकिय मार्गदर्शन. ११ ते १:३० वाजता प्रशिक्षणाची आवश्यकता, विहार समन्वयाची गरज, आजची समाजाची अवस्था, बुद्धिष्ट संस्कृतीची जाणीव, बौद्ध व्यक्तीची परिभाषा. दुपारी २ ते ५ पर्यंत बौद्ध विहार समाज शक्ती केंद्र व्हावे, बुद्ध विहार समन्वय म्हणजे समाज समन्वय, समन्वय संघ शक्तीचा उपाय, बुद्ध विहार समन्वय समितीची निर्मिती, भूमिका, कार्यक्षेत्र व शंका समाधान अशी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेची रूपरेखा आहे.


0 टिप्पण्या