सौ.मनिषा मसुरकर ठाणे शहर प्रतिनिधी जिल्हा ठाणे मो.नं. : ९७६९९१६८६५
ठाणे : शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त शक्तिस्थळ व आनंद आश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.
यावेळी केदार दिघे, अनिता बिर्जे, स्मिता इंदुलकर, महेश्वरी तरे आदीसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी सर्व नवनिर्वाचित महिला आघाडी पदाधिकार्यांचा सन्मान करण्यात आला.
शिवसेनेच्या महिला शक्तीचा सन्मान करताना मला गुरुवर्य आनंद दिघेसाहेबांनी संघटने प्रति त्याग आणि अपार मेहनतीचा दिलेला मंत्र, याचा अनुभव आला. अभिमान वाटला! अशी प्रतिक्रिया यावेळी केदार दिघे यांनी दिली.


0 टिप्पण्या