सौ.मनिषा मसुरकर ठाणे शहर प्रतिनिधी जिल्हा ठाणे चित्रा न्युज मो.नं. : ९७६९९१६८६५
ठाणे : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जुलैसाठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर जाहीर झाले आहेत.
प्राधान्य कुटुंब - तांदूळ रु. ३/- किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो, गहू रु. २/- किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो असे आहेत. अंत्योदय अन्न योजना तांदूळ रु. ३/- किलो दराने प्रती शिधापत्रिका २० किलो, गहू रु. २/- किलो दराने प्रती शिधापत्रिका १५ किलो असे आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजना प्रती व्यक्ती ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मोफत.
अंत्योदय अन्न योजना - साखर रु. २०/- दराने प्रती शिधापत्रिका १ किलो असे आहेत. विगर गॅसधारक शिधापत्रिका केरोसीन ठाणे विभाग केरोसीन ९७.९६ रु, ३९ फ डोंबिवली (मुख्य) रु. ९८.१५/-, डोंबिवली, उल्हासनगर (मुख्य) रु. ९८. २३/- / फ उल्हासनगर (उप) रु. ९८.२३/ ४६/ फ अंबरनाथ रु. ९८.२३/-, ४६/फ बदलापूर रु. ९८.२३/-, ३७/फ भिवंडी रु. ९८.०५/- प्रती लीटर १ व्यक्ती २ लीटर, २ व्यक्ती ३ लीटर व ३ व्यक्ती व वरील ४ लीटर, असे शिधावाटप उपनियंत्रकांनी सांगितले.


0 टिप्पण्या