Ticker

6/recent/ticker-posts

खेल तो चलता ही रहेगा! सवाल यह है की,खेल तुमसे उपरवाली सरकार या निचेवाली सरकार खेल रही है!...


निवडणुक कार्यक्रम रद्दमुळे कुठे आनंद तर कुठे हिरमोड...

मनिष मसुरकर उपसंपादक चित्रा न्युज
मो.नं. : ८८७९३७३१६४

पुणे : राज्यात नुकतेच ९२ नगरपरिषद व ४ नगरपंचायत मधील निवडणुकीचा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती राज्य निवडणुक आयुक्त श्री संजय सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे मागील सात महिन्यांपासुन  सत्ते भुकपासुन लांब पडलेल्या व निवडणुकीची प्रतिक्षा करणाऱ्यांच्या आनंदावर विरजन पडून हिरमोड झाला आहे तर दुसरीकडे मात्र ऐन पाऊसाळ्यात प्रथमच नगरपालीका निवडणुका रद्द झाल्याने शेतकरी राजा व शेतात काम करणारा मजुर राजा,आता निवडणुक प्रचार प्रक्रियेत थोड्या पैसापाई आपला वेळ वाया जाणार नाही व पुर्णतः शेतीकडे लक्ष देवून भरघोस उत्पन्न घेता येईल, ह्या आशेने आनंदीत झाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण निवडणुक आयोगाकडून आलेल्या बातमीमुळे गावात कपाळावर भावी नगरसेवक व उमेदवारी करू इच्छिणाऱ्या लोकांकडे पाहून हेच म्हणत आहे की, *"खेल तो चलता ही रहेगा! सवाल यह की,खेल तुमसे उपरवाली सरकार या निचेवाली सरकार खेल कर रही है!"* असे गंमत म्हणुन विचारले जात आहे.

मागील तीन वर्षांपुर्वी राज्यात जशा विधानसभा निवडणुका घोषीत झाल्या. त्यात कोणी कोणासोबत युती केली व निवडून आले.त्यानंतर जमल नाहीतर कोण कोणासोबत सरकार स्थापन केले.त्यानंतर करोना आजार काय आला.सरकारने करोनावर यशस्वी मात करत. करोना जात नाही,तेवढ्यात सरकार काय पाडलं जात. बंडखोर गट घेऊन नवीन सरकार काय बसवल जात. हे कधी भुतो न भविष्यती पाहिले-ऐकले असेच म्हणावे.त्यात नगरपरिषद-ग्रामपंचायत निवडणुकींचा काळ संपवून जवळपास सात महिने झाल्यावर केन्द्राची राजधानी असलेल्या ठिकाणाहू राज्य निवडणुक आयोगाला ऐन पाऊसाळ्यात निवडणुका घ्यायचा आदेश काय येतो.त्यात सर्वांना कामाला लावून थोडक्यात गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसमोर निवडणूक कार्यक्रम घोषीत करून, आचारसंहिता लागू करून ऐन उमेदवारी अर्ज भरायची वेळ दहा दिवसावर येऊन ठेपल्यावर निसर्गाचा-पाऊसाचा-शेतकरी राजा-जनतेच्या हिताचा-जीवाचा विचार करत निवडणुक कार्यक्रम अचानक रद्द काय केला जातो. त्यामुळे सात महिन्यांनपासुन गुडघ्याला बाशिंग व सत्ता-भुकेपासुन लांब झालेल्यांचा आनंदावर एकप्रकारे विरजन टाकण्यात आले असुन म्हणून लोक आज गावात कपाळी भावी नगरसेवक व उमेदवारी करू इच्छिणाऱ्यांकडे पाहून गंमतीने हेच म्हणत आहे की, *"खेल तो चलता ही रहेगा!सवाल यह है की,खेल तुमसे उपरवाली सरकार या निचेवाली सरकार कर रही है!.."* असे खोचक शब्दांचा मारा-वापर करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या