Ticker

6/recent/ticker-posts

नादुरुस्त ट्रक ला ट्रॅव्हल्स ची धडक, २ ठार १४ जखमी


राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ मोहघाटा जंगलातील घटना

जखमींवर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार सुरू


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भडारा :- राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील मोहघाटा जंगलात नादुरुस्त ट्रक रस्त्याचे कडेला उभा असताना ट्रॅव्हल्स चालकाचे लक्षात न आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून नादुरुस्त ट्रक ला मागील बाजूस धडक दिल्याने ट्रॅव्हल्स च्या कॅबीन व वाहकाचे बाजूचा चींदामिंदा होऊन २ जन ठार झाले. त्यात एका महिलेचा समावेश असून १४ इसम जखमी झाल्याची घटना १४ जुलै रोज गुरुवार ला सकाळी ५:३० वाजता दरम्यान उघडली. मृतकाचे नाव टेकचंदकुमार चंदुलाल चंद्रकार(३६) रा. सिर्सिदा, जिल्हा दुर्ग(छत्तीसगढ), पुष्पांजली रुपकुमार शर्मा(५६) रा. पांढरीबिटकरी रायपूर(छत्तीसगढ) अशी आहेत. जखमींवर साकोली चे उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे. महामार्ग पोलिस मदत केंद्र गडेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले पथकासह घटनास्थळी पोहचून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली. 
         मोहघाटा जंगल परिसरातील दुहेरी रस्त्यावर(टू लेन) ट्रक क्रमांक ओ.डी.०५ बी.बी. ५५१० रात्रीचे सुमारास नादुरुस्त झाल्याने महामार्गाचे कडेला थांबलेला होता. सदर ट्रक चे दोन्ही बाजूंनी टिफ्लेक्टर तथा कोन लावून सुरक्षित करण्यात आले होते. सकाळचे सुमारास नागपूर वरून रायपूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक सी.जी.०८ ए.एस. ०८९१ च्या चालकास रस्त्यावरील नादुरुस्त ट्रक लक्षात न आल्याने तथा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून नादुरुस्त ट्रक च्या मागील बाजूस धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेकचंदकुमार चंद्राकर(३६) व पुष्पांजली शर्मा(५६) हे जागीच ठार झाले. तर १४ प्रवाशी जखमी झाले. तुलेशकुमार बगमार(३२), संजय दिवाकर(५०), ब्राम्हणी चंद्राकर(५२), एकांत चंद्राकर(३३), दीपा चंद्राकर(२८), केशव चंद्राकर(५५), कुसुमलता चंद्राकर(५४), रितू शर्मा(४५), कु. वाणी चंद्राकर (१३) इतर ५ जखमींची नावे कळू शकली नाही. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार सुरू असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. 
         अपघातामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. या बाबद महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांना माहिती मिळताच ते पोलिस उपनिरीक्षक नितीन आगासे, पोलिस हवालदार राजेश ठाकरे, बबन अतकरी, पोलिस नायक प्रकाश तांडेकर, शेखर देशकर, विनोद शिवणकर, संजय इश्वरकर, ईश्वर हटवार घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली. या कामी साकोली चे पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर, पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी, वाहतूक पोलीस हवालदार आश्विन भोयर यांनी सहकार्य केले. वृत्त लिही पर्यंत साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या