गजानन जिदेवार तालुका विशेष प्रतिनिधी हदगाव जि.नांदेड
हदगाव- दि.16 तालुक्यातील मौजे उंचाडा येथील नुकसानग्रस्त शेतक-यानी नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून पूरग्रस्ताना लवकरात लवकर भरपाई देवून न्याय देण्याची मागणी हदगांव तहसीलदार जिवराज डापकर यांच्याकडे निवेदनाद्वारे उंचाडा येथील ग्रामस्थांनी केली.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उंचाडा परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे . पेरलेले बि बियाने वाहून गेले.शेती खरडल्या शेतक-याच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आदी मागण्यांचे निवेदन उपपसरपंच दिनकर चव्हाण यांच्यासह अनेक शेतक-यानी तहसीलदार जिवराज डापकर यांना निवेदन दिले, मागील ८ ते १० दिवसा पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पेरलेले सोयाबिन पिक हे पुर्णतः जमिनीत नासुन नष्ट झाले आहे . या पावसाच्या अती पाण्यामुळे नदी – नाल्यांना पुर येवून व त्या पुराच्या पाण्यामुळे नदी – नाल्याच्या काठच्या जमिनी खरडुन गेल्या आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत . या सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आले आहे . या दुबार पेरणीमुळे शेतकरी खचला परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन त्या शेतीचे तात्काळ पंचनामे करुन, शासन दरबारी नोंद घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली . श्रीमती आसराबाई नारायण डोके (ग्रामपंचायत उंचाडा) , दिनकर बापुराव चव्हाण (उपसरपंच उंचाडा) , ग्रामपंचायत उंचाडा,बाबुसराव तान्हाजी चव्हाण , ज्ञानेश्वर गणेशराव चव्हाण , विलास पांडुरंगराव चव्हाण (जिल्हा उपाध्यक्ष सरपंच संघटना नांदेड) व परिसरातील शेतकऱ्यांकडून केली आहे.


0 टिप्पण्या