संजय ठोंबरे जिल्हा विशेष प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर:- जिल्हा पोलीस घटकातील ई-टपाल आणी २ प्लस या उपक्रमांना श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस चा गव्हर्नन्स नाऊ २"" "इंडीया पोलीस समिट अॅण्ड
अवाडर्स २०२२" पुरस्कार प्राप्त
स्मार्ट पॉलीसींग या संकल्पनेतून पोलीस दलातील नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानाला वाव मिळण्यासाठी श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस या संस्थेकडून गव्हर्नन्स नाऊ इंडीया पोलीस समिट अॅण्ड अवार्ड आयोजीत करण्यात येतो. सदर अवार्ड करीता देशातील सर्व पोलीस घटकांकडून १) बार्डर्र मॉनेजमेंट २) चाईल्ड सेफटी ३) कमांड अँड कंट्रोल सेंटर ४) कम्युनिटी पोलीसींग ५) क्राइम इनव्हेस्टीगेशन अँड प्रासेक्युशन ६) सायबर क्राईम ७) इंटेलीजन्स कलेक्शन ८) पोलीस मॉर्डनायझेशन ९) पब्लीक प्रोक्युरमेंट इन इंटरनेट सिक्युरीटी १०) रोड सेफटी अॅण्ड ट्राफीक मॅनेजमेंट ११) स्मार्ट पोलीस स्टेशन १२ सव्हिलेस अॅण्ड मॉनिटरंग १३) टेक्नॉलॉजी १४) ट्रेनिंग ॲण्ड कॉसीटी बील्डींग १५) वुमन सेफ्टी १६) डिजास्टर्स मॅनेजमेंट या श्रेण्याअतंर्गत त्यांच्याकडील नावीण्यपुर्ण तन्त्रंज्ञानाबाबत
प्रस्ताव मागवुन त्यातुन निवड केलेल्या प्रस्तावांना अवार्ड देण्यात येतो. आज दिनांक १५/०७/२०२२ रोजी श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस या संस्थेकडून वरील श्रेण्यांकरीता देशातील एकुण ४३ पोलीस घटकांना त्यांच्या नावीण्यपुर्ण योजनेकरीता गव्हर्नन्स नाऊ र इंडीया पोलीस समिट अॅण्ड अवार्ड २०२२ देण्यात आला त्यात आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, जम्मु, तेलंगाना, दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओडीसा आणी महाराष्ट्र राज्यातील पोलीस घटकांना समावेश आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापुर आणी नागपुर यांना वरील अवॉर्ड देण्यात आलेला आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस घटकातील ई-टपाल आणी २ प्लस या नावीण्यपुर्ण योजनांना अनुक्रम टेक्नॉलॉजी आणी सव्हिलंस अॅण्ड मॉनिटरींग या श्रेणी करीता श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस या संस्थेकडील गव्हर्नन्स नाऊ २ इंडीया पोलीस समिट अॅण्ड अवार्ड २०२२ पुरस्कार देण्यात आला.
मा.श्री. मनोज पाटील सो, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल सा. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये २ प्लस प्रणाली यशस्वीपणे राबविणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.
अनील कटके यांचे नेतृत्वाखाली सपोनि कैलास बाघ, पोहेका आंबादास शिंदे, पोकों मच्छींद्र बड़े, पोकों विजय धनेधर यांनी विशेष परीश्रम घेतले आहेत, तसेच ई टपाल प्रणाली यशस्वीपणे राबविणे करीता सायबर पोलीस स्टेशनचे पोसई प्रतिक कोळी, यांचे नेतृत्वाखाली पोको अमोल गायकवाड, पोका सम्राट गायकवाड यांनी विशेष परीश्रम घेतले आहेत.


0 टिप्पण्या